लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांच्या दालनासमोरून दुचाकी दामटवित गोंधळ घालणाऱ्या आणि मोझरी येथील क्रीडा संमेलनात धिंगाणा घालणाऱ्या दोन्ही मद्यपी शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हा आदेश पारित करून दोघांनाही चांगलाच दणका दिला आहे.आष्टी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांनी १३ जानेवारीला मद्यधुंद अवस्थेत जि. प. मध्ये येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नगराळे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित जिल्हा परिषदचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांच्या दालनासमोरुन दुचाकी चालवित गोंधळ घातला होता. हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चाणकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विषय शिक्षक प्रशांत हुलके यांनी ९ जानेवारीला मोझरी येथील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला होता. त्याना कार्यक्रमातून बाहेर जाण्यास सांगितले असता ते कुणालाही जुमानत नव्हते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे व विषय शिक्षक प्रशांत हुलके या दोघांनाही तत्काळ निलबित केल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.एकाला कारंजा तर दुसऱ्याला समुद्रपूरसहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांना निलंबन काळात कारंजा पंचायत समिती या मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहे. कारंजाचे गटविकास अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.विषय शिक्षक प्रशांत हुलके यांना निलंबन काळात समुद्रपूर पंचायत समिती या मुख्यालयी राहण्याचे आदेश आहे. त्यांनाही समुद्रपूरचे गटविकास अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
गोंधळ घालणारे दोन मद्यपी शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST
आष्टी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांनी १३ जानेवारीला मद्यधुंद अवस्थेत जि. प. मध्ये येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नगराळे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित जिल्हा परिषदचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांच्या दालनासमोरुन दुचाकी चालवित गोंधळ घातला होता.
गोंधळ घालणारे दोन मद्यपी शिक्षक निलंबित
ठळक मुद्देसीईओंचा आदेश : शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ