दोन प्रकरणांत चौघांना सश्रम कारावास
By Admin | Updated: September 24, 2014 23:39 IST2014-09-24T23:39:45+5:302014-09-24T23:39:45+5:30
मारहाणीच्या घटनांतील दोन प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ यातील दोन आरोपींना सहा महिने तर दोघांना एक वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा

दोन प्रकरणांत चौघांना सश्रम कारावास
समुद्रपूर : मारहाणीच्या घटनांतील दोन प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ यातील दोन आरोपींना सहा महिने तर दोघांना एक वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ दोन्ही प्रकरणात न्या़ आसुदानी यांनी निर्वाळा दिला़
समुद्रपूर पोलीस ठाण्यासच्या हद्दीतील मौजा करडा (जुना) येथील रत्नमाला अनिल चहांदे व तिचा पती अनिल रामदास चहांदे यांना ३० जानेवारी २००८ रोजी लालेश्वर वानखेडे व भाऊराव वानखेडे यांनी उसणे गहू का मागितले, या कारणावरून काठी व कुऱ्हाडीने मारून गंभीर जखमी केली़ याबाबतच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला़
संपूर्ण तपासानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले़ यात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समुद्रपूर येथील न्यायालय क्रमांक ३ चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वि.र. आसुदानी यांनी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३२४ अधिक ३४ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुणावली़
दुसऱ्या प्रकरणात डोंगरगाव येथील प्रदीप चंदनखेडे यांना २५ डिसेंबर २००७ रोजी दिवाकर व दिलीप चंदनखेडे यांनी माझ्या पोरीच्या लटा का धरल्या, यावरून लाठ्याकाठ्यांनी गंभीर मारहाण केली़ तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले़ यात न्यायालय क्रमांक ३ चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वि.र. आसुदानी, यांनी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३२३ अधिक ३४ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावला.
दोन्ही प्रकरणांत सरकारी वकील अॅड़ संदीप देवगिरकर यांनी युक्तीवाद केला़ त्यांना ठाणेदार जिट्टावार व झोटींग यांनी सहकार्य केले़ डोंगरगाव येथील प्रकरणाचा तपास सुधाकर पचारे यांनी तर करडा येथील प्रकरणाचा तपास जागेश्वर मिश्रा यांनी केला़(तालुका प्रतिनिधी)