केळझरच्या विश्राम गृहाजवळ ब्लेडने हल्ल्याच्या दोन घटना
By Admin | Updated: September 5, 2016 00:46 IST2016-09-05T00:46:03+5:302016-09-05T00:46:03+5:30
येथील विश्रामगृहाजवळ दहा ते बारा अज्ञात इसमांनी दोन घटनेत चार जणांवर ब्लेडने हल्ला केला

केळझरच्या विश्राम गृहाजवळ ब्लेडने हल्ल्याच्या दोन घटना
केळझर : येथील विश्रामगृहाजवळ दहा ते बारा अज्ञात इसमांनी दोन घटनेत चार जणांवर ब्लेडने हल्ला केला. यामुळे केळझर-दहेगाव रस्त्याने ये-जा करणाऱ्यांत दहशत पसरली आहे. या प्रकरणी मात्र कोणीच पोलिसांत तक्रार दिली नाही.
सेलू कृउबासचे संचालक संदीप वाणी व त्यांचे मित्र दिलीप पाटील आणि बबन वाघमारे हे सेलूकडून दहेगावला चारचाकी वाहनाने जात होते. त्यांना या मार्गावर रूमाल बांधलेल्या दहा ते बारा अज्ञात इसमांनी अडविले. त्यांना वाहनातून आहेर खेचून शिवीगाळ करीत मारण्यास सुरुवात केली. या टोळीतील काहींनी या तिघांवर ब्लेडने वार केले. संदीप वाणी व त्यांच्या मित्रांनी जीवाच्या आकांताने आरडा ओरड करून या टोळीच्या तावडीतून सुटका करून घेतली. दुसरी घटना बुधवारी घडली. अंकुश उईके रा. दहेगाव हे त्यांचा आॅटो घेवून जात असताना त्यांना अडवून मारहाण केली. हल्लेखोर केळझरचेच असल्याची शंका व्यक्त होत आहे.(वार्ताहर)