‘त्या’ चोरीतील अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: February 26, 2017 00:50 IST2017-02-26T00:50:20+5:302017-02-26T00:50:20+5:30
येथील साईनगर परिसरातील विमल मेश्राम यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे

‘त्या’ चोरीतील अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
दोघांना अटक : तीन लाखांच्या मुद्देमालाचा शोध
आर्वी : येथील साईनगर परिसरातील विमल मेश्राम यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्यापासून आतापर्यंत २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरीतील सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल अद्याप चोरट्यांच्या हवालीच आहे. त्याचा शोध आर्वी पोलीस करीत असून तो लवकरच हाती येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अटकेतील आरोपी विनोद दयाराम कुथे (३७) रा. हनुमान वॉर्ड आणि भुरे खाँ उर्फ सलीम उर्फ सल्लू रा. इंदिरा कॉलनी बैतुल गंज, बैतुल ता.जि. बैतुल, मध्यप्रदेश या दोघांकडून चोरीत वापरलेला चाकू, दुचाकी, आलमारी तोडण्याकरता वापरलेली लोखंडी टॉमी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. यासह चोरीतील सोन्याच्या पाटल्याचे तुकडे ५८ हजार २२० ग्रॅम किंमत १ लाख ४२ हजार १५७ रुपये, दोन डोरले असलेले मंगळसूत्र १० ग्रॅम अंदाजे किंमत २५ हजार, सोन्याची चैन १५ ग्रॅम किंमत ४५ हजार रुपये, कानातील टॉप्स एक जोडी ५ हजार रुपये, सोन्याची अंगठी १० ग्रॅम किंमत २५ हजार असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर मुद्देमालाचा शोध पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तसेच विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक चौधरी व उपनिरीक्षक हिवाळे तसेच गुन्हे अन्वेषण पथकाचे कर्मचारी जमादार गजानन लामसे, अमित जुवारे, विक्की मस्के, राजेश राठोड, गजानन वडनेरकर, विशाल मडावी, नितीन चौधरी, प्रवीण देशमुख, अतुल अडसड, भूषण निघोट यांनी केली.(शहर प्रतिनिधी)