अडीच लाखांचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: April 24, 2015 01:59 IST2015-04-24T01:59:05+5:302015-04-24T01:59:05+5:30
जिल्हा विशेष पोलीस पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन दिवसांत अडीच लाखांचा देशी- विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला.

अडीच लाखांचा दारूसाठा जप्त
वर्धा : जिल्हा विशेष पोलीस पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन दिवसांत अडीच लाखांचा देशी- विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. विशेष पथकाच्या धाडसत्रामुळे दारूविक्रेत्यांची झोप उडाली आहे.
पुलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत वायफड येथे किशोर जित्रुजी कावनकुटे, संजय वासुदेव जाधव हे दोघे दुचाकीवरून दारूसाठा वाहून नेत होते. त्यांच्याकडून दुचाकीसह ३८ हजार ८०० रूपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच वायफड येथीलच रवींद्र रामदास मोहिडे यांच्या घरून २० लीटर मोहा दारू जप्त करण्यात आली. देवळी नाका परिसरात केलेल्या कारवाईत विजय वाघाडे याच्याकडून दुचाकीसह ४२ हजार ५०० रूपयांचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला. देवळी येथे प्रितम नारायण कन्नाके गोंडपुरा याला देवळी नाका येथून दुचाकीवरून दारूसाठा वाहून नेताना अटक करण्यात आली. त्याच्याजवळून देशी दारूच्या ४८ निपा व दुचाकी असा ७० हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
वर्धा शहरातील रामनगरात प्रकाश कल्लूप्रसाद श्रीवास याच्याकडून सहा हजारांचा विदेशी दारूसाठा हस्तगत करण्यात आला. शांतीनगर येथे लोकेश आंबेकर, विधी संघरक्षित बालक, शुभम दिलीप भुजाडे, या तिघांकडून विदेशी दारू आणि दुचाकी असा ८० हजार ८०० रूपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस.बी. मुल्ला, संजय माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक साबळे, नामदेव किटे, दिनेश तुमाने, वैभव कट्टोजवार, हरिदास कक्कड, अमरदीप पाटील, राजेश पचारे, आत्माराम भोयर आदींनी कारवाई केली.(शहर प्रतिनिधी)