साडेसात लाखांचा दारुसाठा जप्त
By Admin | Updated: April 25, 2016 01:56 IST2016-04-25T01:56:58+5:302016-04-25T01:56:58+5:30
नागपूरमार्गे चंद्रपूरकडे दारूचा साठा घेऊन जात असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली.

साडेसात लाखांचा दारुसाठा जप्त
नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील कारवाई
समुद्रपूर : नागपूरमार्गे चंद्रपूरकडे दारूचा साठा घेऊन जात असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून शनिवारी रात्रीच्या सुमारास आरंभा टोल नाका परिसरात नाकाबंदी करीत दोन कारवायांत तिघांना ताब्यात घेण्यात आले.
पहिल्या कारवाईत एमएच-३४-एबी-५८२० चा चालक दिलीप दशरथ सवाई (३२) रा. शिवनी पांढुर्णा (म.प्र.) याला वाहनासह ताब्यात घेतले. गाडीसह ३ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्याच वेळेस दुसरीही कार्यवाही करण्यात पोलिसांना यश आले. यात एमएच ३१- एएच-७९८३ चा चालक सिद्धार्थ रामु मानवटकर (१७) रा. चौदा मैल कळमेश्वर आणि पंकज जयलाल कटरे (२२) रा. वेहाड ता. हिंगणा नागपूर या दोघांनाही याब्यात घेत वाहनासह ३ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही मिळून ७ लाख ४८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात समुद्रपूर पोलिसांना यश आले. समुद्रपूरचे ठाणेदार आर.टी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय. अजय अवचट, राहुल गिरडे, राधाकृष्ण घुगे, राजू जयसिंगपुरे, मनोहर मुडे, रवि वानखेडे, चेतन पिसे, यशवंत गोल्हर यांनी ही कार्यवाही केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)