शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

बारावीत हिंगणघाटचे ‘वैभव’ कायम राखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

हिंगणघाटच्या वैभव मनोज सिंघवी याने ९७.३३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. यासोबतच आर्वी येथील मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा विलास दाऊतपुरे हिने ९६.१७ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर वर्ध्यातील जी. एस. कॉमर्स कॉलेजच्या विष्णू रामदास स्वामी याने ९५.८३ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. ८) दुपारी १ वाजता जाहीर झाला. यामध्ये हिंगणघाटच्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव मनोज सिंघवी याने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे, कोरोनाकाळापूर्वी सन-२०२० मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत हिंगणघाट येथील विद्यार्थी प्रणय शिरपुरे व हिमांशू चव्हाण या दोघांनी जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविला होता. आता वैभवनेही जिल्ह्यातून प्रथम येत हिंगणघाटचे  ‘वैभव’ कायम ठेवत त्यात आणखीच भर घातली आहे. हिंगणघाटच्या वैभव मनोज सिंघवी याने ९७.३३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. यासोबतच आर्वी येथील मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा विलास दाऊतपुरे हिने ९६.१७ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर वर्ध्यातील जी. एस. कॉमर्स कॉलेजच्या विष्णू रामदास स्वामी याने ९५.८३ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय आलेले दोघेही विज्ञान शाखेचे असून, तृतीय क्रमांक पटकाविणारा विद्यार्थी वाणिज्य शाखेचा आहेत. तृतीय आलेला विष्णू स्वामी हा वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात पहिला आला आहे. तसेच प्राची नगराळे वाणिज्य शाखेतून द्वितीय आली आहे. जिल्ह्यात विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशन या चारही शाखांमधून १७ हजार ८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. यामध्ये आठ हजार ८८१ मुले, तर आठ हजार २०६ मुलींचा समावेश आहे. यापैकी आठ हजार ८३४ मुले आणि आठ हजार १७६ मुली अशा एकूण १७ हजार १० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून आठ हजार ३३० मुले आणि सात हजार ८९३ मुली असे एकूण १६ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ९५.३७ टक्क्यावर पोहोचला. बारावीच्या निकालात घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेसह नातेवाइकांकडूनही कौतुक होत आहे. 

आष्टी तालुका अव्वल; सेलू तालुका ढँग -    आठही तालुक्यातील बारावीच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला तर आष्टी तालुका अव्वल, तर सेलू तालुका सर्वात ढँग असल्याचे दिसून येते. आष्टी तालुक्याचा निकाल ९७.०२ टक्के, देवळी तालुका ९६.२१ टक्के, हिंगणघाट ९५.०५ टक्के, वर्धा ९५.४६ टक्के, समुद्रपूर ९५.०१ टक्के, आर्वी ९४.७८ टक्के, कारंजा ९२.८१ टक्के तर सेलू तालुक्याचा निकाल ९२.६२ टक्के लागला आहे. 

कोरोनाने परीक्षा पद्धतच बदलली, शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातच परीक्षा- कोरोनाच्या महामारीमुळे गेल्यावर्षी बारावीची परीक्षाच होऊ शकली नाही. परिणामी अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुणदान करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षी ५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याच्या निकालाचे शतक हुकले होते. तब्बल ९९.५९ टक्के निकाल लागल्याने ऐतिहासिक नोंद करण्यात आली. कोरोनामुळे टक्केवारी वाढली असली तरी गुणवत्ता मात्र ढासळल्याचा अनुभव या दोन वर्षामध्ये आला. यावर्षी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली; परंतु कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव सुटल्याने या परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्यात आला. यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र देण्यात आले आणि परीक्षेकरिता वेळही वाढवून देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी यावर्षी चांगला निकाल देऊन यश संपादन केले.

दहावीनंतर बारावीतही ‘ऋतुजा’ची चमकदार कामगिरी-   आर्वी येथील विद्या निकेतन इंग्लिश स्कूलमधून शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दहावीचे शिक्षण घेऊन दहावीच्या परीक्षेत आर्वी येथील ऋतुजा विलास दाऊतपुरे हिने ९८.६० टक्के गुण घेत जिल्ह्यातून द्वितीय येण्याचा मान पटकाविला होता, तर आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात ऋतुजा दाऊतपुरे हिने आपली चमकदार कामगिरी कायम ठेवत जिल्ह्यातून दुसरा येण्याचा बहुमान पटकाविला आहे. आर्वी येथील मॉडेल ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या ऋतुजा हिला ९६.१७ टक्के गुण मिळाले आहेत. तिला प्रशासकीय सेवेत जायचे असल्याचे ती सांगत असून, ऋतुजाने स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणून अमरावती येथे एका शिकवणी वर्गात प्रवेशही घेतला आहे. ऋतुजाचे वडील विलास दाऊतपुरे हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नांदपूर येथे सीनिअर ऑपरेटर म्हणून सेवा देत आहेत, तर आई गृहिणी आहे. दहावीत किमान सहा ते आठ तास अभ्यास करून घवघवीत यश संपादित करणाऱ्या ऋतुजाने बारावीतही अभ्यासाबाबत सूक्ष्म नियोजन करून त्यावर कृती केली. ऋतुजा ही विलास व वंदना दाऊतपुरे यांची एकुलती एक लेक आहे.

आई अशिक्षित, वडील तिसरी पास अन् मुलगा बारावीत तृतीय-    समुद्रपूर : आम्ही शिकलो नाही, तू शिक्षित होऊन मोठा होत नाव कमव, असाच काहीसा धीर देणाऱ्या तिसरी पास वडील अन् अशिक्षित आईच्या मुलाने जिद्द व कठीण परिश्रमाच्या जोरावर जिल्ह्यातून तृतीय येण्याचा बहुमान पटकाविला आहे. विष्णू रामदास स्वामी आगरे ले-आउट वॉर्ड क्रमांक १५, रा. समुद्रपूर असे बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वर्धा शहरातील गो. से. वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विष्णू रामदास स्वामी याला बारावीच्या परीक्षेत ९५.८३ टक्के गुण मिळाले आहे. शिक्षणासाठी तो जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा येथे किरायाच्या खोलीत राहत होता. विष्णूचे वडील रामदास हे मूळचे राजस्थान राज्यातील नागोर जिल्ह्यातील रहिवासी. पण मागील २५ वर्षांपासून ते समुद्रपुरातच राहून ठेक्याने शेती करून कुटुंबाचे पालन पोषण करतात. विष्णूची आई मुन्नीदेवी या अशिक्षित, तर वडील तिसरी पास असले तरी त्यांनी मुलगा विष्णू व मुलगी मनीषा हिला शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देत शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन दिलेे. त्यानंतर विष्णूने जिद्द व कठीण परिश्रमाची तयारी दाखवित बारावीच्या परीक्षेत यश पटकाविले.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल