स्वयंरोजगाराकडे वळून बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा
By Admin | Updated: August 9, 2014 23:53 IST2014-08-09T23:53:26+5:302014-08-09T23:53:26+5:30
सद्यस्थितीत युवकांना भेडसावत असलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळून आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करून,

स्वयंरोजगाराकडे वळून बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा
वर्धा : सद्यस्थितीत युवकांना भेडसावत असलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळून आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी लागणारे कौशल्य विकसित करून, आत्मविश्वास जागृत करून त्याला परिश्रमाची जोड देवून, आपले व्यक्तिमत्त्व विकसित करावे लागेल, असे मत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था निदेशक नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले.
नेहरू युवा केंद्र व स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र, वर्धा द्वारे न्यु आर्टस कॉलेज, वर्धा परिसरात असलेल्या स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या निवासी शिबिरात वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्याील ४० युवक-युवती सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निशिकांत घैसास उपस्थित होते. आपल्या परिस्थितीवर, समस्येवर रडत बसण्यापेक्षा त्याविरूद्ध हिम्मत ठेवून संघर्ष करा. त्यावर नक्कीच मात करण्यात यशस्वी व्हाल असे ते यावेळी म्हणाले. प्रास्ताविकात नेहरू युवा केंद्र, वर्धा च्या जिल्हा युवा समन्वयक ज्योती मोहिते यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे फुलशेती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सुरूवातीला उद्योजकतेची मानसिकता विकसित करण्यासाठी युवकांना जीवन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य आदी बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवस निवासी प्रशिक्षण ग्रामीण युवकांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखपाल धरमलाल धुवारे, मंगेश डुबे,यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)