गौण खनिजांचे ओव्हर लोडिंग कायम बंद करा
By Admin | Updated: November 21, 2015 02:32 IST2015-11-21T02:32:16+5:302015-11-21T02:32:16+5:30
जिल्ह्यात अनेक दिवसांपासून गौण खनिजाची ओव्हर लोडींग वाहतूक होत आहे. ती कायम बंद करण्यात यावी,..

गौण खनिजांचे ओव्हर लोडिंग कायम बंद करा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मोटर मालक संघटनेची मागणी
वर्धा : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून गौण खनिजाची ओव्हर लोडींग वाहतूक होत आहे. ती कायम बंद करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा मोटर मालक संघटनेद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनानुसार, ओव्हर लोडिंगमुळे शहरातील अनेक ट्रक मालकांवर उपासमारीची वेळ येत आहे. रेती, गिट्टी, मुरूम आदी गौण खनिजे पोकलँड मशीनद्वारे मर्यादेपेक्षा जास्त वाहनांमध्ये भरण्यात येतात. त्यामुळे त्यांना मजुरांची गरज भासत नाही. परिणामी ट्रकवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात ट्रकच्या माध्यमातून लाखो मजुरांना रोजगार मिळतो. परंतु ओव्हर लोडिंगमुळे त्यांच्या मजुरीवर गंडांतर येत आहे. त्याचप्रमाणे या ओव्हर लोडिंगमुळे रस्त्यांचीही दुर्दशा होत आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात अत्ताउल्ला पठाण, प्रशांत पाटील अजीम शेख, देवीदास मोरे, विशेष वंजारी, गोपाल वंजारी अंकुश डफळे आदीसह अनेकांचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)