अवैध गौण खनिज उत्खनन बंद करा
By Admin | Updated: July 12, 2014 23:50 IST2014-07-12T23:50:08+5:302014-07-12T23:50:08+5:30
देवळी नजीकच्या गिरोली (ढगे) परिसरात सुरू असलेले स्टोन क्रेशर व उत्खनन त्वरित बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन केले आणि ठराव घेवून सगळ्या

अवैध गौण खनिज उत्खनन बंद करा
वर्धा : देवळी नजीकच्या गिरोली (ढगे) परिसरात सुरू असलेले स्टोन क्रेशर व उत्खनन त्वरित बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन केले आणि ठराव घेवून सगळ्या स्टोन क्रेशर आणि उत्खननचे ना हरकत रद्द केले आहे. गत वर्षभरापासून स्टोन व्यवसाय बंद करण्यासाठी आणि गावाला या संकटातून वाचविण्यासाठी गावकऱ्यांचा लढा सुरू आहे.
वर्षभरापासून गिरोली ग्रामस्थ आपल्या हक्कासाठी विविध मार्गाने लढत आहे. परिसरात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन आणि क्रेशर बंद पाडण्यासाठी शक्य ते उपाय गवकरी करीत आहे. दरम्यान गटविकास अधिकारी सेलू यांच्या आदेशन्वये गिरोली ग्रामपंचायतची विशेष ग्राम सभा घेण्यात आली आणि स्टोन व्यवसाय बंद करण्याच्या बाजूने ठराव घेण्यात आला. ज्यामध्ये २४२ पैकी २२६ लोकांनी ठरावाच्या तर १६ लोकांनी ठरावाच्या विरूद्ध मत दिले.
ग्रामसभा अध्यक्ष रामभाऊ दुधाबडे यांनी ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. ग्रामसभेला सरपंच आशा भोंगाडे, ग्रामसचिव लांजेवार, विस्तार अधिकारी कांबळे, पंचायत समिती अधिकारी, नायब तहसीलदार एस. आर. यादव, अव्वल कारकून यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. या आधी २३ जानेवारी २०१४ ला गिरोली ग्रामवासी यांनी विशेष ग्रामसभेत गौण खनिज उत्खनन व स्टोन क्रेशर बंद करण्याचा १६१ विरुद्ध २० मतानी ठराव पारित केला होता. जिल्हाधिकारी वर्धा संबंधित अधिकाऱ्यांना ठरावाची प्रत देण्यात आली. त्यावर काहीच कार्यवाही न झाल्यामुळे गावकऱ्यांनी दुसरी विशेष ग्रामसभा ५ जुलै २०१४ रोजी घेतली. त्यात २२६ विरुद्ध १६ मतानी ठराव बहुमतानी पारित केला. गावाला लागून ६०० मिटर अंतरावर गुप्ता स्टोन क्रेशर व गणेश स्टोन चालू आहे. संबंधित ग्राम सभा ठराव हा जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून केव्हा आणि कशी कारवाई केली जाईल याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)