अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:51 IST2018-10-26T23:51:15+5:302018-10-26T23:51:49+5:30
गावातील महाप्रसादाला गेलेल्या आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना वर्धमनेरी येथे घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : गावातील महाप्रसादाला गेलेल्या आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना वर्धमनेरी येथे घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मंगेश दिगांबर काकडे (२३) रा. वर्धमनेरी असे आरोपीचे नाव आहे. गावातील शारदादेवीनिमित्त अंगणवाडीजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिडिता आपल्या दोन बहिणींसोबत महाप्रसादाकरिता गेली होती. आरोपी मंगेशही तेथेच जेवन करीत होता. जेवन झाल्यानंतर त्याने पिडितेला ‘तू येथून लवकर चल नाही तुला येथील लोक मारतील’ अशी भिती दाखवत तिला अंगणवाडीच्या मागे नेले. तेथेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा तिने आरडाओरड केल्यावर तिच्या दोन्ही बहिणी आवाजाच्या दिशेने धावत गेल्या. त्यामुळे मंगेशने तेथून पळ काढल्याने पिडिता त्याच्या तावडीतून सुटली. घाबरलेल्या पिडितेने ही आपबिती आईला सांगितल्यावर आईने आरोपीचे घर गाठले. त्याला विचारणा केली असता झोपेचे सोंग घेतलेल्या मंगेशने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या पिडितेच्या आईने शेतात गेलेल्या पतीला फोनकरुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्यासह गावातील काही नागरिक मंगेशच्या घरासमोर गोळा झाले. त्यांनी मंगेशला चांगलाच चोप देऊन तळेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच वर्धमनेरी गाठून मंगेशला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द बालकांचे लैंगिक अत्यचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास ठाणेदार रवि राठोड यांच्या मार्गदर्शनात जमादार नामदेव नंदनवार, सुधीर डांगे, नीलेश पेटकर, रंजना मसराम करीत आहे.
पीडिता म्हणतेय मामा
आरोपी मंगेशला पीडिता व दोघीही बहिणी मामा म्हणून हाक मारायच्या. त्याच नराधम मामाची वक्रदृष्टी या भाचीवर पडली. ही घटना जेव्हा पीडितेने आईला सांगितली तेव्हा आईलाही विश्वास बसला नाही. आता कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न या घटनेनंतर सर्वांपुढे निर्माण झाला आहे.