ट्रकची आॅटोला धडक; दोन गंभीर
By Admin | Updated: October 16, 2014 23:29 IST2014-10-16T23:29:37+5:302014-10-16T23:29:37+5:30
येथील जाम चौरस्त्यावर एका आॅटोला नागपूरवरून येणाऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील आजनदा पाटी येथे घडली.

ट्रकची आॅटोला धडक; दोन गंभीर
समुद्रपूर : येथील जाम चौरस्त्यावर एका आॅटोला नागपूरवरून येणाऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील आजनदा पाटी येथे घडली.
आॅटो क्र. एम.एच.३२ बी. ४०११ हा नागपूर वरून जाम येथे जात होता तर ट्रक क्र. एम.एच.३४ एम. ६९१ हा नागपूर येथून चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान आजदा पाटीवर ट्रकने अॅपेला जबरदस्त धडक दिली. यामुळे आॅटो उलटला. यात आॅटोतील अनुमान अवघडे (५०) व रमेश इवनाते (४५) दोघेही रा. जाम ता. समुद्रपूर हे गंभीर जखमी झाले. या दोघांनाही नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची तक्रार लंकेश हनुमान अवघडे यांनी पोलिसांना देताच ट्रक ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी ट्रक चालक कुष्णाकुमार यादव (१९) रा. चंद्रपूर याला अटक केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस असून जखमींवर उपचार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)