रस्त्याच्या कडेला उभा ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:45 IST2018-02-27T23:45:10+5:302018-02-27T23:45:10+5:30

सेलू येथील वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या यशवंत चौकात कापसाच्या गाठी भरलेला सीजी ०४, जे.ए.०४२८ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकने पाहता पाहता पेट घेतला.

The truck on the roadside crashed | रस्त्याच्या कडेला उभा ट्रक पेटला

रस्त्याच्या कडेला उभा ट्रक पेटला

ठळक मुद्देकापूस गाठी भस्मसात : सेलूच्या यशवंत चौकातील घटना

ऑनलाईन लोकमत
घोराड : सेलू येथील वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या यशवंत चौकात कापसाच्या गाठी भरलेला सीजी ०४, जे.ए.०४२८ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकने पाहता पाहता पेट घेतला. कापसाच्या गाठींची राख झाली. यात किती रुपयांच्या गाठी होत्या याची माहिती मात्र कळू शकली नाही.
जुवाडी येथील जिनींगमधल्या कापसाच्या गाठी घेवून नागपूर कडे जात असताना चालकाने सेलू येथील यशवंत चौकात ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. चालक व वाहक पानटपरीवर आले. अवघ्या काही मिनिटातच ट्रकने पेट घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी मोठा जमाव झाला. शहर भाजपा अध्यक्ष वरुन दफ्तरी यांनी वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांना भ्रमणध्वनीवरुन कळविले तर पोलीस जमादार महेश काटकर यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. अवघ्या अर्ध्या तासात अग्निशामक वाहन सेलूला पोहचले. तोपर्यंत ट्रकचा कोळसा झाला होता.
हायवेवरच ट्रकने पेट घेतल्याने वाहतूक शहरातील रस्त्याने वळविण्यात आली. मात्र ट्रकने पेट कसा घेतला हे कळू शकले नाही. घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे.

Web Title: The truck on the roadside crashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.