लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भरधाव ट्रकने कंटेनरला धडक दिली. यात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि दुसरा चालक गंभीर जखमी झाला. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील आजदा शिवारात शनिवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना येथील घडली.प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडून जामकडे जाणाऱ्या एम.एच. ३४ ए.व्ही. २७३६ क्रमांकाच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम.एच. ३२ क्यू. ३७५१ क्रमांकाच्या कंटेनरला मागाहून धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचालक शेख हमीद शेख मुजीब रा. अहमदपूर जि. लातुर याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आणि दुसरा चालक शेख मुनिर हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे सहा. पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे, सचिन गाढवे, किशोर लभाने, दीपक जाधव, गजानन राऊत, प्रवीण बागडे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना मिळेल त्या वाहनाने सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे रवाना केले.हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या दर्शनीय भागाचा चुराडा झाला. अपघातग्रस्त ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला करण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.या मार्गाने नेहमीच वाहतूक नियमांना बगल देत रस्त्याच्या कडेला इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने जड वाहने उभी केली जातात. नियोजित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगमर्यादेने वाहन पळविली जात असल्याने विशेष मोहीम होती घेण्याची गरज आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठारवर्धा - अज्ञात वाहनाने दुचाकीचालकास धडक दिली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला. हा अपघात आर्वी-नाचणगाव मार्गावर झाला. कवडू तडस, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कवडू तडस हे एम. एच. ४० ए. एन. ९६३५ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. ३२ एक्स. १६४३ क्रमांकाच्या वाहनचालकाने त्यांना जबर धडक दिली. यात कवडू यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या अपघाताची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.कारची ऑटोला धडक; प्रवासी जखमीवर्धा : भरधाव कारने प्रवासी घेऊन जाणाºया ऑटोला धडक दिली. यात ऑटोतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात देवळी-जामणी मार्गावर झाला. आसमादादा शहा रा. जामणी हा एम. एच. ३२ बी. ८४५९ क्रमांकाच्या ऑटोने देवळी येथून प्रवासी घेऊन जामणीच्या दिशेने जात होता. ऑटो तिवारी ले-आऊट परिसरात आला असता भरधाव असलेल्या एम. एच. ३१ एफ. सी. १७२४ क्रमांकाच्या कारने ऑटोला धडक दिली. यात ऑटोतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली आहे.
ट्रकची कंटेनरला धडक; ट्रकचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST
नागपूरकडून जामकडे जाणाऱ्या एम.एच. ३४ ए.व्ही. २७३६ क्रमांकाच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम.एच. ३२ क्यू. ३७५१ क्रमांकाच्या कंटेनरला मागाहून धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचालक शेख हमीद शेख मुजीब रा. अहमदपूर जि. लातुर याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आणि दुसरा चालक शेख मुनिर हे दोघे गंभीर जखमी झाले.
ट्रकची कंटेनरला धडक; ट्रकचालक ठार
ठळक मुद्देदोघे गंभीर । नागपूर-हैदराबाद मार्गावरील अपघात