बसला धडक देऊन ट्रक उलटला
By Admin | Updated: May 23, 2015 02:19 IST2015-05-23T02:19:30+5:302015-05-23T02:19:30+5:30
वर्धा-नागपूर मार्गावरील खडकीनजीक भरधाव ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला धडक दिली.

बसला धडक देऊन ट्रक उलटला
सिंदी (रेल्वे) : वर्धा-नागपूर मार्गावरील खडकीनजीक भरधाव ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला धडक दिली. या धडकेत रस्त्याच्याकडेला जाऊन ट्रक उलटला. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही. केवळ बसचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक एमएच ४३ वाय-४८८० हा रायपूर येथून मुंबईला तांदळाचे पोते घेऊन निघाला होता. सदर ट्रक खडकीनजीक आला असता त्याने समोरून येणाऱ्या सोलापूर-नागपूर या रातराणी बस एमएच ४० वाय-५७७४ ला धडक दिली. धडक बसताच ट्रक रस्त्याच्या कडेला जात उलटला. तर बस रस्त्याच्या बाजूला थांबली.
यात ट्रकचा वाहक किरकोळ जखमी झाला. यात बसमधील एकही प्रवासी जखमी झाला नाही. या घटनेची तक्रार बस चालक दिनेश चांदेकर (३३) यांनी सिंदी (रेल्वे) पोलिसात केली. तक्रारीवरून ट्रक चालकाविरूद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)