ट्रक नाल्यात पडला...
By Admin | Updated: September 28, 2015 02:26 IST2015-09-28T02:26:53+5:302015-09-28T02:26:53+5:30
नागपूर-अमरावती महामार्गावर तळेगाव (श्यामजीपंत) येथील पॉलीटेक्निक महाविद्यालयासमोर असलेल्या ...

ट्रक नाल्यात पडला...
ट्रक नाल्यात पडला... नागपूर-अमरावती महामार्गावर तळेगाव (श्यामजीपंत) येथील पॉलीटेक्निक महाविद्यालयासमोर असलेल्या गतिरोधकावर असंतुलित झालेला ट्रक थेट बाजूला असलेल्या नाल्यात जात उलटला. यात चालक श्रीकृष्ण नारायण पराते रा. नेरपरसोपंत हा जखमी झाला. एम एच ४० ०९६१ क्रमांकाचा हा ट्रक चंद्रपूर येथून सिमेंटचे पोते घेवून शेंदूरजना येथे जात असल्याचे समोर आले. हा अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दिनेश झांबरे त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकाला उपचाराकरिता येथील रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी तपास सुरू आहे.