तळेगाव (श्या.पत.) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून अमरावतीकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने सत्याग्रही घाटातील बाहुबली मंदिरासमोर अचानक पेट घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली असून, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.अमरावती येथील ट्रान्सपोर्टिंग कंपनीतून एमएच ४० बीएल १६५३ क्रमांकाचा ट्रक केमिकल ड्रम, काॅस्टिक सोडा व कपड्याच्या गठान घेऊन नागपूरकडे जात होता. तळेगाव येथील सत्याग्रही घाटात आल्याबरोबर वायरिंग जळाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. चालक श्यामबाबू जाधव रा. इलाहाबाद याच्या लक्षात येताच त्याने ट्रक उभा करून तळेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ओरिएंटल पाथवेज व आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत ट्रकच्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात कैलास माहोरे, श्याम गहाट, नरवेज खान, राहुल अमोने व देवेंद्र गुजर करीत आहेत.
तळेगावातील सत्याग्रही घाटात धावत्या ट्रकचा उडाला भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST
अमरावती येथील ट्रान्सपोर्टिंग कंपनीतून एमएच ४० बीएल १६५३ क्रमांकाचा ट्रक केमिकल ड्रम, काॅस्टिक सोडा व कपड्याच्या गठान घेऊन नागपूरकडे जात होता. तळेगाव येथील सत्याग्रही घाटात आल्याबरोबर वायरिंग जळाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. चालक श्यामबाबू जाधव रा. इलाहाबाद याच्या लक्षात येताच त्याने ट्रक उभा करून तळेगाव पोलिसांना माहिती दिली.
तळेगावातील सत्याग्रही घाटात धावत्या ट्रकचा उडाला भडका
ठळक मुद्देमहामार्गावरील वाहतूक प्रभावित