चालकाला मारहाण करून १० लाखांच्या लिफ्टसह ट्रक लंपास
By Admin | Updated: February 7, 2015 01:24 IST2015-02-07T01:24:52+5:302015-02-07T01:24:52+5:30
चालकाला भ्रमणध्वनीवरून लिफ्ट नागपूर येथे न उतरविता जाम येथे उतरवायची आहे़, असे सांगून ट्रकला थांबवून चालकाला मारहाण करीत ...

चालकाला मारहाण करून १० लाखांच्या लिफ्टसह ट्रक लंपास
समुद्रपूर :चालकाला भ्रमणध्वनीवरून लिफ्ट नागपूर येथे न उतरविता जाम येथे उतरवायची आहे़, असे सांगून ट्रकला थांबवून चालकाला मारहाण करीत लिफ्टसह ट्रक लांबविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघड झाली. यात चोरट्यांनी एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण रामदास गाते (४५) रा़ विहिरगाव जि़ गोंदिया हा चेन्नई येथील डागा गॅरेजमधून ट्रक क्ऱ एम़एच़३२/७९६ ने १० लाख रुपये किंमतीच्या दोन लिफ्ट घेवून नागपूरसाठी निघाला होता़ २ फे्रबु्रवारीच्या रात्री ८़३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील जाम चौरस्ता पास करून महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगावजवळ ट्रक पोहचला असता अतुल नामक व्यक्तीने फोन केला व तुझ्या ट्रक मधील लिफ्ट नागपूरला नाही जामलाच उतरवायची आहे़, तेव्हा तु ट्रक थांबव असे सांगितले. यावरून ट्रक चालकाने ट्रक थांबविला असता मागाहून दुचाकीवर अतुल नामक व्यक्ती व एका आनोळखी व्यक्तीने ट्रक चालाकाला दुचाकीवर बसवून कुठे लिफ्ट उतरवायची आहे ती जागा दाखवितो असे म्हणून नेले. दूरवर कालव्याच्या रस्त्याने नेवून त्याला दुचाकीवरून ढकलून मारहाण करून त्याला तिथेच सोडून देण्यात आले. या दोघांनी लिफ्टसह ट्रक लंपास केला. यात एकूण १६ लाखांचा माल लंपास केला़
या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी सदर ट्रकचालकाने समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केला असून प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल जिट्टावार करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)