स्टेअरिंग लॉक झाल्याने ट्रक उलटला, चालक जखमी
By Admin | Updated: March 30, 2017 00:31 IST2017-03-30T00:31:06+5:302017-03-30T00:31:06+5:30
टमाटर घेऊन नागपूर येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकचे स्टेअरींग लॉक झाल्याने तो पलटी झाला.

स्टेअरिंग लॉक झाल्याने ट्रक उलटला, चालक जखमी
हळदगाव शिवारातील अपघात : टमाटर रस्त्यावर विखुरले
समुद्रपूर : टमाटर घेऊन नागपूर येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकचे स्टेअरींग लॉक झाल्याने तो पलटी झाला. यात चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर हळदगाव शिवारात बुधवारी दुपारी ३ वाजता घडला. या अपघातामुळे महामार्ग दोन तास बंद होता.
नागपूर येथून ट्रक क्र. एमएच ३५ के ३८५८ चा चालक भरधाव चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, स्टेअरिंग लॉक झाल्याने ट्रक पलटी झाला. यात टमाटर रस्त्यावर विखुरले. एका बाजूची वाहतूक दोन तास बंद होती. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीसचे सुरेश भोयर यांनी घटनास्थळ गाठून जखमी चालकाला दवाखान्यात पाठविले. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास सुरू आहे. यातील चालकाचे नाव कळू शकले नाही.(तालुका प्रतिनिधी)