ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार
By Admin | Updated: April 27, 2015 01:40 IST2015-04-27T01:40:39+5:302015-04-27T01:40:39+5:30
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला.

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार
हिंगणघाट : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोहजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. अंबादास लोंढे रा. निधा (टाकळी) असे मृतकाचे नाव आहे तर त्याचा भाऊ नानाजी लोंढे हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास लोंढे हे त्यांचा भाऊ नानाजी याच्यासह दुचाकीने जात होते. दरम्यान नागपूरवरून हैदराबाद मार्गे जाणाऱ्या टी.एन. ३४ ई. ३०२८ या या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालवित असलेले अंबादास जागीच ठार झाले तर त्याचा भाऊ नानाजी गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने जखमीला सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले. ट्रकचालक व क्लिनर यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नाईक घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालकाचा शोध घेणे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)