भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:03 IST2017-09-17T00:03:25+5:302017-09-17T00:03:39+5:30

भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, ....

Tribal development should be done during BJP's tenure | भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा

भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा

ठळक मुद्देहंसराज अहीर : आदिवासी आघाडीच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
येथे आयोजित भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महाराष्टÑ प्रदेश आदिवासी मोर्चा आघाडीचे प्रा. हरिशचंद्र भोये, भाजपच्या आदिवासी विकास आघाडीचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा. अशोक नेते, महाराष्टÑ प्रभारी अमसिंग तिलावत, लक्ष्मीकांत घानगावे, खा. रामदास तडस, उध्दव येरमे, कृष्णराव चव्हाण, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. पास्कल धनारे, आ. डॉ. देवराव होळी, आ. राजु तोडसाम, श्याम धुर्वे, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी आदींची उपस्थिती होती.
अमरसिंग तिलावत यांनी महाराष्टÑात २६ आदिवासी लोकसंख्या बहुल असलेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यात आदिवासींच्या अनेक अडचणी आहेत. सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवाव्यात. वेळप्रसंगी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दरबारीही याबाबत बैठक घ्यावी, अशा सुचना दिल्या.
जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खा. रामदास तडस यांनी केले. राज्यध्यक्ष हरिशचंद्र भोये यांनी महाराष्टÑात १४ जिल्हे व ५० विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे याच भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे सांगितले. राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे येथे पुढील काळात आदिवासी आघाडीच्या प्रदेश बैठका घेवून मुंबई येथील बैठकीत आदिवासी आश्रम शाळांची समस्या, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचण, आदिवासी लोकप्रतिनिधींना निधी मिळण्यात होत असलेली दिरंगाई आदीबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी बाबतही चर्चा यावेळी करण्यात आली.
बैठकीला महाराष्टÑातील २६ पैकी आदिवासी आघाडीचे १४ जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. राज्यातील आदिवासी आघाडीच्या संघटन बांधनीची माहिती या बैठकीत घेण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तथा भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Tribal development should be done during BJP's tenure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.