बसथांब्यावर हातपंप असूनही प्रवासी तहानलेले
By Admin | Updated: June 16, 2016 02:33 IST2016-06-16T02:33:28+5:302016-06-16T02:33:28+5:30
तालुक्यातील हिंगणी-आमगाव मार्गावर असलेल्या सालई (पेवठ) येथील बसथांब्यावर प्रवाशांची तहान भागविण्यासाठी हातपंप देण्यात आला.

बसथांब्यावर हातपंप असूनही प्रवासी तहानलेले
हातपंप नादुरुत : प्रवासी पाण्याकरिता होतात व्याकूळ
सेलू : तालुक्यातील हिंगणी-आमगाव मार्गावर असलेल्या सालई (पेवठ) येथील बसथांब्यावर प्रवाशांची तहान भागविण्यासाठी हातपंप देण्यात आला. मात्र येथील हातपंप अनेक दिवसांपासून बंद असून त्याची दुरवस्था झाली आहे. बसथांब्यापासून गाव एक किमी. अंतरावर असल्याने पाण्यासाठी प्रवासी व्याकूळ होत आहे.
हिंगणी-आमगाव मार्गावरून सालई (पेवठ) गाव एक किमी अंतरावर आहे. लोकवस्ती मुख्य रस्त्यापासून आत असल्याने येथील प्रवाशांना मुख्य मार्गावर असलेल्या बसस्थांब्यावर येऊन बस पकडावी लागते. खासगी वाहनाकरिता याच बसथांब्याजवळ यावे लागत असल्याने प्रवाशांची तहान भागविण्यासाठी येथे हातपंप देण्यात आला. या हातपंपाचा दंडा अनेक महिन्यांपूर्वी तुटला आहे. शिवाय अन्य साहित्य लंपास करण्यात आले. झाला. या हातपंपाची दुर्दशा झाली आहे.
सालई गाव जंगलव्याप्त व दुर्गम भागात पठारावर ससले आहे. त्यामुळे या गावाकडे शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्यकहा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. प्रवाशांकरिता अत्यंत महत्वाच्या असलेल्या या हातपंपाची दुरूस्ती करण्याची मागणी अद्याप प्रलंबीत आहे.(तालुका प्रतिनिधी)