आर्वी-नांदपूर मार्गावर प्रवास धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:14+5:30

तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा असणारा आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास आता धोक्याचा झाल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या मार्गावरुन राज्य परिवहन मंडळाच्या दिवसाला १६ ते १८ बसफेऱ्या होतात. याच मार्गावर कापसाचे जिनिंग प्रेसींग, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे.

Travel hazard on Arvi-Nandpur road | आर्वी-नांदपूर मार्गावर प्रवास धोक्याचा

आर्वी-नांदपूर मार्गावर प्रवास धोक्याचा

ठळक मुद्देरस्त्याची झाली चाळणी : कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा असणारा आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास आता धोक्याचा झाल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या मार्गावरुन राज्य परिवहन मंडळाच्या दिवसाला १६ ते १८ बसफेऱ्या होतात. याच मार्गावर कापसाचे जिनिंग प्रेसींग, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. तसेच हा मार्ग नांदपूर, देऊरवाडा, एकलरा, लाडेगाव, टाकरखेडा, भाटोडा, बेतोडा, सर्कसपूर, निंबोळी, देऊरवाडा, राजापूर, अहिरवाडा, कर्माबाद या गावांना जाऊन मिळतो. त्यामुळे या गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आर्वीत येतात. याच मार्गावर विदर्भातील प्रसिद्ध टाकरखेडा व जहागीरपूर देवस्थान आहे. येथे विदर्भातून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असताना या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावर तालुक्यातील चार गावांचे पुनर्वसनही आहे. अशा वर्दळीच्या मार्गावर खड्डयांच्या समस्येमुळे वाहनचालकांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागते. या मार्गाचे निर्माण करण्यासंदर्भात वारंवार निवेदने देण्यात आली पण; अद्यापही मागणी पुर्णत्वास गेली नाही. केवळ खड्डा बुजविण्याचेच काम तीन वर्षापासून सुरु आहे. पावसाळ्यात या खड्डयात पाणी साचल्यानंतर मार्ग काढणे कठीण होऊन जाते. त्यामुळे या मार्गाची डागडूजी न करता कायम दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Travel hazard on Arvi-Nandpur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.