परिवहनच्या यंत्रालाच पासच्या कार्डची ‘अ‍ॅलर्जी’

By Admin | Updated: August 22, 2014 00:02 IST2014-08-22T00:02:44+5:302014-08-22T00:02:44+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला पासेस देण्यात आल्या आहेत़ पूर्वी कागदी पासेस दिल्या जात होत्या; पण आता प्लास्टीक कार्ड दिले जाते़ यावरील ‘कोड नंबर’

The transport system has passed the 'Allergy' | परिवहनच्या यंत्रालाच पासच्या कार्डची ‘अ‍ॅलर्जी’

परिवहनच्या यंत्रालाच पासच्या कार्डची ‘अ‍ॅलर्जी’

वर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला पासेस देण्यात आल्या आहेत़ पूर्वी कागदी पासेस दिल्या जात होत्या; पण आता प्लास्टीक कार्ड दिले जाते़ यावरील ‘कोड नंबर’ मशीनमध्ये ‘मॅच’ करून पाहिला जातो; पण हे कार्ड सध्या पासधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे़ परिवहनच्या यंत्रांना या कार्डचीच ‘अ‍ॅलर्जी’ झाल्याचे दिसून येत आहे़
परिवहन महामंडळाने ‘एक पाऊल प्रगतिकडे’ म्हणत पासधारक प्रवाशांना स्मार्ट कार्ड बनवून दिले़ या स्माट कार्डमध्ये विशिष्ट प्रकारचा कोड नंबर टाकण्यात आलेला आहे़ तत्सम क्रमांक परिवहनकडे नमूद केलेले असतात़ हे स्मार्ट कार्ड बसच्या वाहकाकडे असलेल्या तिकीट देण्याच्या मशीनमध्ये ‘क्रॅश’ केले जाते़ यात सदर कोड नंबर मॅच झाला तर संबधित प्रवाशाची पास ग्राह्य धरली जाते, अन्यथा त्याला तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो़ सध्या प्रत्येक पासधारक विद्यार्थी, नोकरदार यांच्याकडे असे स्मार्ट कार्ड आढळून येते़
वर्धा ते खरांगणा (मो़) या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशास या स्मार्ट कार्डचा वेगळाच अनुभव आला़ बुधवारी रात्री एका बसमध्ये बसल्यानंतर त्यांचे स्मार्ट कार्ड एक्सेस होत नव्हते़ वाहकाने प्रयत्न करूनही कार्ड एक्सेस न झाल्याने सदर प्रवाशाला तिकीट काढून प्रवास करावा लागला़ यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच समस्येचा सामना करावा लागला़ यामुळे संबधित प्रवाशाने जवळच्या गावाचे तिकीट घेत ती बस सोडली़ यानंतर दुसऱ्या बसमध्ये सदर प्रवासी बसले असता त्या बसमधील वाहकाच्या मशीनमध्ये सदर कार्ड एक्सेस झाले आणि त्यांना तिकीट काढण्याची गरज भासली नाही़ या प्रकारामुळे वाहकांसह सदर प्रवासीही चकित झाला़
एका बसच्या वाहकाकडे असलेल्या मशीनमध्ये एक्सेस होणारे कार्ड दुसऱ्या दोन बसेसमधील मशीनमध्ये एक्सेस का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ यात स्मार्ट कार्डमध्ये काही त्रूटी आहे की परिवहनच्या मशीनमध्ये, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत चौकशी करावी व प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The transport system has passed the 'Allergy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.