पाणी देयक भरणा केंद्र स्थलांतरित करा
By Admin | Updated: September 30, 2016 02:32 IST2016-09-30T02:32:08+5:302016-09-30T02:32:08+5:30
कारला मार्ग व पिपरी (मेघे) परिसरात जीवन प्राधीकरणच्या नळ योजनेचे पाणी येते. या पाण्याचे मासिक देयक अदा करावे लागते.

पाणी देयक भरणा केंद्र स्थलांतरित करा
नागरिकांची मागणी : टेकडीवरील केंद्रामुळे ज्येष्ठांना होतो त्रास
वर्धा : कारला मार्ग व पिपरी (मेघे) परिसरात जीवन प्राधीकरणच्या नळ योजनेचे पाणी येते. या पाण्याचे मासिक देयक अदा करावे लागते. या भागातील देयक भरणा करण्याकरिता हनुमान टेकडीवरील केंद्रावर जावे लागते. येथे जाताना वृद्ध नागरिकांना त्रास हातो. स्त्रिया, युवती यांना टेकडीवर चढून जावे लागते. देयके भरल्यावर उतरूण येणे गैरसोयीचे होते. यामुळे बिल भरणा केंद्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा खालच्या स्तरावर कारला चौक परिसरात सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
देयक भरणा केंद्र गैरसोईच्या ठिकाणी असल्यामुळे पाण्याच्या देयकाची वसुली १०० टक्के पूर्ण होत नाही. तसेच आम्हाला जर कुठे लिकेज दिसत असले तर आम्ही कोणत्या नंबरवर सूचना द्यावी तो नंबर देयकात जाहीर करावा, यामुळे पिण्याची नासाडी होणारी नाही. याचा विचार विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी करावा अशी मागणीही नागरिकांनी विभागाला दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदन देतेवेळी धनंजय वझरकर, भरत चौधरी, निळकंठ राऊत, मोरेश्वर तेलरांधे, नरेंद्र भुरे, अशोक नगराळे, सुरेश माळी, विलास तायवाड, नारायण हिंगे, श्याम जगताप, वसंत गिरी, प्रदीप कवडे, सुरेश लांडगे, गुलाब उमाटे, सुधाकर झाडे, हरिचंद्र धोंगडे, अशोक देवळीकर, नारायण बांगडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)