शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘वर्धा जंक्शन’ची गाडी रुळावर येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देरेल्वेवर अवलंबून घटकांची होतेय उपासमार : प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ होण्याची प्रतीक्षा कायम

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना सक्तीने घरी राहावे लागले. काहींनी घरुन काम सुरु केले. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कामगार आणि मजुरांचे झालेले हाल आजतागायत कायम आहेत. लाखो लोकांचा उदरनिर्वाह करणाऱ्या रेल्वेस्थानकांवर अजूनही हजारो हातांना कामाची प्रतीक्षा आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे. वर्धा रेल्वे जंक्शनवरुन लॉकडाऊनपूर्वी अनेक प्रवासी गाड्या धावत होत्या. या गाड्यांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असायची. मात्र, लॉकडाऊन लागल्याने एरव्ही प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर आज घडीला निरव शांतता दिसून येत आहे. हातावर पोट असलेल्यांवर मात्र, उपासमारीची वेळ आली असून अनेक हमाल आपल्या स्वगावी कामाच्या शोधात परतले आहे.फलाटावरील विक्रेत्यांवर आली उपासमारकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे वर्धा रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्धा रेल्वेस्थानकावर दररोज २० ते २२ प्रवासी रेल्वे गाड्यांची ये-जा असते.स्थानकावरील फलाटांवर सुमारे ३० पेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र उभे राहून कुटुंबीयांसाठी पोटाचा प्रश्न सुटावा, दोन पैसे मिळावे, यासाठी डोळ्यात तेल ओतून अख्खी गाडी पिंजून काढायचे. मात्र, २३ मार्च पासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकात गाड्यांचे आगमन होत नसल्याने प्रवेशबंदी असून कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.जीवनावश्यक वस्तूंची मदत द्यावीउदरनिर्वाह कसा चालवावा, याची त्यांना चिंता सतावत आहे. कोरोनामुळे हमाल, रिक्षाचालक, व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील हातावरच्या मजुरांची उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी.विशेषत: ज्या मक्तेदाराकडे मजूर कामावर होते त्यांनी निदान या परिस्थितीत त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे