हॉटेलात ट्रेलर शिरला; चार जखमी
By Admin | Updated: January 4, 2015 23:17 IST2015-01-04T23:17:32+5:302015-01-04T23:17:32+5:30
येथील आष्टी टी पॉर्इंट जवळ असलेल्या मामाच्या हॉटेलमध्ये अचानक भरधाव जाणारा ट्रेलर शिरला. या अपघातात एक जण गंभीर तर तिघे किरकोळ जखमी झाले.

हॉटेलात ट्रेलर शिरला; चार जखमी
तळेगाव (श्यामजीपंत) : येथील आष्टी टी पॉर्इंट जवळ असलेल्या मामाच्या हॉटेलमध्ये अचानक भरधाव जाणारा ट्रेलर शिरला. या अपघातात एक जण गंभीर तर तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील टी पॉर्इंटवर मामा का धाबा नामक हॉटेल आहे. या हॉटेलात नागपूरकडून अमरावतीकडे सुसाट जाणारा ट्रेलर सी.जी. ०४ जे.डी. ९५५३ हा अचानक सरळ मार्गावरून हॉटेलात शिरला. ट्रक हॉटेलात शिरताच साऱ्यांची तारांबळ उडाली.
या अपघातामध्ये हॉटेलचा कर्मचारी दिनेश आगरकर (३५) रा. तळेगाव तसेच ग्राहक, जगनसिंग चरणसिंग टाक (३०) ट्रक चालक विजय गौतम (३२) रा. भिलाई तसेच ट्रेलरचा दुसरा चालक गुड्डूसिंग (३०) रा. भिलाई हा ट्रेलरमध्ये दबल्याने गंभीर जखमी झाले. सदर चालकाला ट्रेलरच्या कॅबीनमधून करढण्याकरिता जवळपास अर्धातास लागला.
माहिती मिळताच ठाणेदार दिनेश झामरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना गावकऱ्यांच्या सहायाने उपचारार्थ प्रथम तळेगाव नंतर आर्वी येथे नेण्यात आले. सदर अपघात हा एवढा भयंकर होता की सुदैवाने हॉटेलसमोर उभी असलेली कार व त्यामधील प्रवासी थोडक्यात बचावले. (वार्ताहर)