वाहतूक सुरक्षा पंधरवड्याच्या सूचनाच नाही
By Admin | Updated: January 1, 2015 23:06 IST2015-01-01T23:06:28+5:302015-01-01T23:06:28+5:30
शहरातील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता वाहतूक पंधरवडा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा पंधरवडा साधारत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो; मात्र यंदा हा पंधरवडा

वाहतूक सुरक्षा पंधरवड्याच्या सूचनाच नाही
वर्धा : शहरातील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता वाहतूक पंधरवडा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा पंधरवडा साधारत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो; मात्र यंदा हा पंधरवडा राबविण्याबाबत कुठल्याही सूचना शहर वाहतूक शाखेला आल्या नसल्याची माहिती आहे.
शिवाय हा पंधरवडा पुढे कोणत्या तारखेला घ्यावयाचा वा यंदा तो राबविण्यात येणार अथवा नाही या बाबतचीही माहिती वाहतूक पोलिसांना नाही. तारखेनुसार हा कार्यक्रम होईल या अपेक्षेने वाहतूक पोलिसांनी त्यांची तयारी केली; मात्र त्यांना सूचना आल्या नसल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र आहे.
सुरक्षीत वाहतुकीकरिता वाहतूक नियमांची माहिती आवश्यक आाहे. ही माहिती सर्वसामान्यांना देण्याकरिता हा पंधरवडा राबविण्यात येतो. यात शाळेच्या विद्यार्थ्यांसह रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांनाच याची माहिती वाहतूक शाखेच्यावतीने देण्यात येते. पंधरा दिवस या कार्यक्रमात वाहतूक पोलिसांच्यावतीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या पंधरवड्यात प्रयत्न करण्यात येतो.
जानेवारी महिन्याच्या पहिला आठवडा ‘पोलीस रायझींग डे’ म्हणून शासनाच्या दरबारी नोंद आहे. याच आठवड्यात दोन्ही कार्यक्रम एकाचवेळी व्हावा, याकरिता राज्य शासनाच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात येतो. यंदा या कार्यक्रमाची तारीख बदलविण्यात आल्याची माहिती आहे; मात्र वाहतूक विभागाला तसे कुठलेच पात्र आले नाही. या कारणाने हा पंधरवडा केव्हा होईल, याकडे लक्ष आहे.(प्रतिनिधी)