भालदेव सणाची परंपरा सालदऱ्यात अजूनही कायम
By Admin | Updated: September 30, 2014 23:39 IST2014-09-30T23:39:38+5:302014-09-30T23:39:38+5:30
महाभारतकालीन भगवान श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताशी निगडीत असलेल्या गवळ्यांच्या भालदेव या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे़ असे असले तरी सालदरा या गावात मात्र हा सण

भालदेव सणाची परंपरा सालदऱ्यात अजूनही कायम
फनिंद्र रघाटाटे - रोहणा (वर्धा)
महाभारतकालीन भगवान श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताशी निगडीत असलेल्या गवळ्यांच्या भालदेव या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे़ असे असले तरी सालदरा या गावात मात्र हा सण आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो़
पुरातन आख्यायिकेप्रमाणे गवळी बांधव पंचमहाभूताची पूजा म्हणून इंद्राची पूजा करीत होते; पण भगवान श्रीकृष्णाने ही पूजा बंद करण्यास सांगितले़ यामुळे इंद्राचा कोप होऊन मुसळधार पाऊस पडला. जनावरे पुरात वाहून जात असताना गवळ्यांनी श्रीकृष्णाचा धावा केला. तेव्हा त्यांच्या ंरक्षणार्थ श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला; पण कृष्णाच्या कर्मवादी विचारसरणीप्रमाणे पर्वताला लव्ह्यांचा आधार दिला़ त्यानेच तुमचे रक्षण केले म्हणून तुम्ही ‘लव्ह्याचा भालदेव’ म्हणून पूजन करावे, असा उपदेश केल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून गवळी समाज चार दिवस हा सण साजरा करतात. पूढे या समाजाने महानुभाव पंथ स्वीकारल्याने अनेक ठिकाणी ‘भालदेव’ उत्सव साजरा करणे बंद झाले. जिल्ह्यात सालधरा या गावात आजही हा सण उत्साहात साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी पालखी, बॅँडसह संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाते़ विसर्जनही मोठ्या उत्साहात होते. महागाई, टंचाई, धार्मिक भावनांचा लोप यासारख्या कारणांनी याच जिल्ह्यातील विविध गावांत हा उत्सव बंद होण्याच्या मार्गावर असताना सालधरा हे गाव मात्र अपवाद ठरत आहे़ या गावातही महानुभावपंथी आहेत; पण ते त्यांच्या वंशपरंपरेला आजही चिकटून या उत्सवात सहभागी होतात. सालदरा या गावातील भालदेव सण कायम असल्याने अन्य गवळी समाजाचेही हा सण आकर्षणच ठरत आहे.