नागरिक भयभीत : दिवसभर शेतीची कामे व सायंकाळी जागलीअल्लीपूर : गावात गत दोन दिवसांपूर्वी चोरीच्या उद्देशाने जमलेले १५ ते २० युवक एका महिलेच्या सतर्कतेने पळाले. या घटनेची माहिती गावात व आसपासच्या परिसरात पसरताच सर्वत्र चोरट्यांची दहशत पसरली आहे. यामुळे दिवसभर शेतात काम करून घरी परतल्यावर रात्र जागून काढण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. शुक्रवारी रात्री गावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने १५ ते २० युवक चारचाकी वाहने घेवून गळोबा वॉर्डातील आरोग्य केंद्राजवळ उभे होते. यावेळी रात्रीचे १.३० वाजले होते. संपूर्ण गाव गाढ झोपेत असतांना वंजारी यांच्या घरासमोर हे चोरटे दिसताच येथील एका महिलेचे त्यांच्याकडे लक्ष गेले असता तीन आरडाओरड केली. यामुळे घरची मंडळी जागी झाली. या लोकांनीही आरडाओरड केली असता १० ते १५ युवक पळताना दिसले. त्यांनी बनियन व बरमुडा परिधान केल्याचे दिसून आले. या घटनेच्या पूर्वी ढगे ले-आऊट व वॉर्डातील काही नागरिकांनाही असे युवक दिसल्याची चर्चा आहे. यावेळी नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता पाठलाग केला असता त्यातील एका दरेडेखोराची चप्पल सापडून आली. याची माहिती अल्लीपूर पोलिसांना देताच त्यांनीही चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. अल्लीपूर पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला असून गावात गस्त वाढविण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली आहे.(वार्ताहर)तीन दिवसात दोन चोऱ्यानंदोरी - चोरट्यांनी रात्रीच्या सुमारात घरात मागील भागातील पाण्याचे टाके फोडुन चाकुच्या धाकावर रोख १२ हजार रुपयांसह मोबाईल, सोन्याची चेन आदी साहित्य लंपास केले. दुसऱ्या घटनेत नंदोरी चौकातील पानटपरी फोडून ३०० रुपये रोख व ३ हजारांंचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी बुधवारच्या मध्यरात्री १ वाजता दरम्यान चंद्रकौर टाक यांच्या घरातील मागील बाजूस असलेले पाण्याचे टाके फोडून यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना चाकचा धाक दाखवपून रोख १२ हजार रुपये, मोबाईल, कपाटातील सोन्याची साखळी २० ग्रॅम व अंगठी ५ ग्रॅम असा ऐवज लंपास केला. घरात शिरलेले दोन्ही चोरटे चेहऱ्यावर रूमाल गुंडाळून होते असे टाक यांनी पोलिसांना सांगितले.नंदोरी चौकातील पानटपरीधारक नत्थूजी पंचवटे हे पानटपरी उघडण्यास गेले असताना त्यांना चोरी झाल्याचे शनिवारी उघडकीस आले. यात चोरट्यांनी पानटपरीचे मागील बाजूचे टिनपत्रे कापून ३०० रूपये रोखसह ३ हजार रुपयांचा पानमटेरीयल साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. चंद्रकोर टाक व नत्थूजी पंचपटे यांनी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
गावात चोरट्यांची दहशत
By admin | Updated: August 3, 2015 01:51 IST