आज महाफैसला
By Admin | Updated: May 15, 2014 23:48 IST2014-05-15T23:48:32+5:302014-05-15T23:48:32+5:30
काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यातच अंतिम लढत अटळ असली तरी ही लढत काट्याची असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजतापर्यंत

आज महाफैसला
मतदारराजाचा कल कुणाला ? : नव्या खासदाराची उत्सुकता संपणार वर्धा : काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यातच अंतिम लढत अटळ असली तरी ही लढत काट्याची असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजतापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत असून या निकालाची वर्धा लोकसभा मतदार संघातील जनता चातकासारखी वाट बघत आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातच नव्हे, तर प्रत्येक तालुक्यात, शहरात आणि गावागावांमध्ये महिनाभरापासून रंगते असलेल्या चर्चेने आता वेग घेतला आहे. सागर मेघे की रामदास तडस यावरुन पैजा लागत आहे. काहीजण मेघेच निवडून येतील, असे ठामपणे सांगून मतांची गोळाबेरीजही करून दाखवित आहेत. तर काहीजण तडस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत आहेत. येथील खाद्य निगमच्या गोदामात शुक्रवारी सकाळी होणार्या मतमोजणीच्या कामात कुठली हयगय होणार नाही याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. या बंदोबस्ताची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुनील रहाणे, तहसीलदार राहूल सारंग, कुंवर, प्रियदर्शनी बोरकर, सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण भालेराव, एनआयसीचे जयंत बोराडे आदींसह सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. सकाळी ८ वाजतापसून सुूरू होणार असलेल्या मतमोजणीच्या स्थळी येण्याकरिता मज्जाव करण्यात आला असून गडबड रोखण्याकरिता पोलीस बंदोबस्त चोख ठेण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ंमांडली जाताहेत मतांची गणिते देशात काँग्रेसविरोधी वातावरण असल्यामुळे सागर मेघे यांच्यापुढे २00९ मध्ये काँग्रेसला मिळालेली मते टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत २ लाख ४३ हजार मते अधिक पडली. यात सुमारे १ लाख ३0 हजार तरुण मतदार होते, उर्वरित मतदार पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले होते. देशात मोदी लहर असल्यामुळे यातील बहुतांश मते भाजपच्या पथ्यावर पडतील, असा सूरही निकालाचे अंदाज बांधताना ऐकायला मिळत आहे. मात्र भाजपाने स्थानिक पातळीवरही उमेदवारापेक्षा मोदींच्याच नावावर मते मागितली. स्थानिक उमेदवारावरही अनेक गोष्टी अवलंबून आहे. यात तरुण उमेदवार म्हणून इथला तरुण मतदार सागर मेघे यांनाही तेवढीच पसंती देत होता. यामुळे तरुणांच्या मतांचे विभाजन काँग्रेससाठी फायद्याचे राहील, असाही एक वर्ग पटवून देत आहे. भाजपने गुपचूप जातीचे कार्ड चालविल्यामुळे तेली समाज एक झाला. याचा फायदा तडस यांना होईल. या तुलनेत कुणबी समाजाची मते विभागली गेल्याने भाजपची बाजू मजबूत असल्याची चर्चाही नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. या निवडणुकीत अनुसूचित जाती आणि मुस्लीम समाजाची गठ्ठा मते काँग्रेसच्या बाजुने गेल्याचे बोलले जात आहे. याचा थेट फायदा सागर मेघे यांना होईल, असा अंदाज आहे. बसपाचे उमेदवार चेतन पेंदाम आणि आपचे अलिम पटेल यांच्यात तिसर्या क्रमांकासाठी लढत होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती; मात्र मतदानानंतर आपचे पटेल या शर्यतीतून मागे पडले असून बसपाचे चेतन पेंदाम तिसर्या क्रमांकाचे स्थान अबाधित राखतील. त्यांना २00९ ची मते टिकवता येईल, याची शाश्वती कमी आहे. असे झाल्यास याचा फायदा सागर मेघे यांना मिळतील, असाही अंदाज आहे.