आमरा राम : अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय कमिटीची सेवाग्राम यात्री निवासात बैठकसेवाग्राम : सध्याचे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. निवडणुकी अगोदर दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. सरकारची धोरणेच आता शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने सरकारला जागविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे मत किसान सभेचे अध्यक्ष व माजी आमदार आमरा राम यांनी शुक्रवारी यात्री निवास मधील बैठकीत कार्यकर्त्यांसमोर मांडले.अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय कमिटीची बैठक आजपासून यात्री निवास येथे सुरू झाली. यावेळी माजी खासदार हन्नन मोल्ला, उपाध्यक्ष एस. आर. पिल्ले, खासदार जितेंद्र चौधरी, उपाध्यक्ष मदन घोष, के. वरदान, एस. मालारेड्डी, सहसचिव एन. के. मुल्ला, बिजू क्रिष्णण, अशोक ढवळे, चौधरी, वित्त सचिव पी. क्रिष्णा प्रसाद आदी उपस्थित होते.बैठकीमध्ये किसान सभेच्या मागील वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आंदोलने व चळवळींबाबतच्या प्रगतीची वाटचाल लक्षात घेवून सरकारच्या धोरणावर शेतकरी आणि सामान्य जनतेच्या सहकार्याने लढा अधिक तीव्र कसा करता येईल यावर विचारमंथन व चर्चा करण्यात आली. तसेच किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. देशभरातील शंभरावर प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले. होते. वर्धेचे डॉ. अशोक ढवळे, यशवंत झाडे हे देखील यावेळी उपस्थित होते. आणखी दोन दिवस येथील बैठकीत विचारमंथन होणार आहे.(वार्ताहर)
सरकार विरोधातील लढा तीव्र करण्याची वेळ
By admin | Updated: July 11, 2015 02:41 IST