मिलिटरीच्या छावणीत ‘टायगर’ची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:00 IST2018-10-16T23:59:20+5:302018-10-17T00:00:03+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने नुकतीच मिलिटरीची छावणी असलेल्या पुलगावच्या दारूगोळा भंडार परिसरात एन्टी घेतली आहे. त्यासंदर्भातील काही पुरावे वन विभागाच्या हाती लागले आहेत.

Tiger's entry into the military camp | मिलिटरीच्या छावणीत ‘टायगर’ची एन्ट्री

मिलिटरीच्या छावणीत ‘टायगर’ची एन्ट्री

ठळक मुद्देवन्य प्राण्याची शिकार केल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने नुकतीच मिलिटरीची छावणी असलेल्या पुलगावच्या दारूगोळा भंडार परिसरात एन्टी घेतली आहे. त्यासंदर्भातील काही पुरावे वन विभागाच्या हाती लागले आहेत. याच परिसरात सदर वाघाने वन्य प्राण्याची शिकार केल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. ज्या परिसरात सध्या वाघाचा मुक्तसंचार होत आहे त्या भागात सर्वसामान्य व्यक्तींना जाण्यास प्रतिबंध असून मंगळवारी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी संबंधितांकडून परवानगी मिळून काही परिसराची पाहणी केली.
देवळी तालुक्यातील एकपाळा परिसरात वाघाने काही वेळ घालविल्यानंतर त्याने आपल्या नैसर्गिक अधिवासाचा शोध घेण्यास सुरूवात केली. याच दरम्यान या वाघाने देवळी तालुक्यातील मुरदगाव शिवारातून पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भंडारच्या परिसरात प्रवेश घेतला आहे. त्याबाबतची माहिती मिळताच मंगळवारी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी सदर दारूगोळा भंडाराच्या वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी घेत काही परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना सदर वाघाच्या पावलाचे ठसे केंद्रीय दारूगोळा भंडाराच्या परिसरात आढळून आले आहेत. याच परिसरात कुठल्यातरी वन्य प्राण्याची या वाघाने शिकार केल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाºयांकडून वर्तविला जात असून त्याची शहानिशा सध्या केली जात आहे. या वाघाने आतापर्यंत कुठल्याही मनुष्यावर हल्ला केला नसला तरी नागरिकांनी सर्तक राहणे गरजेचे आहे.
ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागितली परवानगी
पुलगाव येथील दारूगोळा भंडाराच्या आवारात कुणालाही ये-जा करण्याची परवानगी नाही. हा परिसर प्रतिबंधित आहे. सुमारे ४८ किमी आणि सात हजार हेक्टर परिसर हा केंद्रीय दारूगोळा भंडाराच्या कार्यक्षेत्रात असून या परिसरावर मिलेटरीचे जवान लक्ष ठेवून असतात. कुठल्याही अधिकाºयालाही येथे सहज प्रवेश मिळत नसून वन विभागाने या भागात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्याची परवानगी सीएडी कॅम्पच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे मागीतली आहे. शिवाय वन विभागाच्या काही अधिकाºयांनाही या आवारात प्रवेश देण्यात यावा, अशी विनंतीही वन विभागाने केली आहे.
 

Web Title: Tiger's entry into the military camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ