व्याघ्र दर्शनाने उमरविहिरात दहशत वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:38 IST2019-07-16T22:38:36+5:302019-07-16T22:38:49+5:30
उमरविहिरा शेतशिवारात वाघाने वासरू ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

व्याघ्र दर्शनाने उमरविहिरात दहशत वासरू ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नमवारग्राम : उमरविहिरा शेतशिवारात वाघाने वासरू ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. प्राप्त माहितीनुसार, उमरविहिरा येथील शेतकरी प्रमोद फलके यांच्या शेतातील गोठ्या जवळ काही नागरिकांना वाघाचे दर्शन झाले. याच वाघाने त्याच परिसरात असलेल्या वासराला ठार केले. अगदी गाव शिवाराशेजारी हे शेत असून वाघ गावात तर येणार नाही ना अशी भीती या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. माहिती मिळताच वनविभागाचे पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय या घटनेची नोंद घेतली आहे.