एटीएममधून रोकड लांबविणाºया तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:15 IST2017-09-21T00:15:05+5:302017-09-21T00:15:19+5:30
चोरट्यांनी शहरातील एटीएममधून ३,७१,५०० रुपये लंपास केले. २६ जून ते ३ जुलै दरम्यान ही चोरी झाली. तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. यात १५ सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली.

एटीएममधून रोकड लांबविणाºया तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : चोरट्यांनी शहरातील एटीएममधून ३,७१,५०० रुपये लंपास केले. २६ जून ते ३ जुलै दरम्यान ही चोरी झाली. तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. यात १५ सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली. विकास उर्फ शिवम राजबहादूर सिंग (२३), विशाल शिवकुमार अग्निहोत्री (१९) व कुलदीप यादव रा. कानपूर उत्तरप्रदेश, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
तीनही चोरटे खासगी वाहनाने २८ जून रोजी शहरात आले. युको बँकेचे एटीएम एनसीआर कंपनीचे असून आरोपींकडील चावी लागत असल्याने ते एलएल गेस्टहाऊस येथे थांबले. तेथे त्यांनी आधार कार्डची सत्यप्रत दिली. रात्री ११.३० नंतर युकोच्या एटीएममधून डुप्लीकेट चावी व इतर लोकांच्या एटीएम कार्डचा आधार घेत पैसे काढले. मशीनची पैसे मोजण्याची प्रक्रिया सुरू होताच वरचे झाकण समोर खेचून आत हात टाकून हे दीड लाख रुपये काढले. यानंतर पुन्हा १ जुलै रोजी तसाच प्रयोग केला. त्यांनी एकूण ३,७१,५०० रुपये काढले.
सीसीटीव्ही फुटेजवरून चोरटे शहरात थांबल्याचा संशय आल्याने पोलिसांनी लॉज तपासले. एल.एल. गेस्टहाऊस व अमृत पॅलेसमध्ये कानपूर येथील ओळखपत्र मिळाल्याने संशय आला. बँकेच्या स्टेटमेन्टवरून एटीएम कार्ड कानपूर उत्तरप्रदेशचे असल्याचे दिसून आले. खातेदारांचा शोध घेत चौकशी केली व सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता ओळख झाली. यावरून तिघांना शिताफीने अटक केली. पोलीस कोठडी घेत साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एम., एसडीपीओ कोल्हे, ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात जाविद शेख, रामदास चकोले, संदीप महाकाळकर, राहुल देशमुख यांनी केली.
मोबाईल चोरट्यास अटक, २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त
गोमाजी वॉर्डातील शेख जाबीर शेख कादर (२२) हा चोरीचे मोबाईल वापरतो व विक्री करतो, अशी माहिती मिळाली. यावरून डीबी पथकाने त्याला ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने अल्पवयीन मुलाच्या साथीने अनेक मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २८ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा २ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., एसडीपीओ कोल्हे, ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिसन इप्पर, सचिन भारशंकर, सायबर सेल वर्धा यांनी केली.