तीन वर्षांपासून फरार पिटेकर भावंडांना अटक
By Admin | Updated: December 4, 2014 23:13 IST2014-12-04T23:13:40+5:302014-12-04T23:13:40+5:30
पिंपळगाव (माथनकर) येथील सचिन पेठेकर याच्या घरावर गावातील १२ जणांनी हल्ला केला. यात सचिन व त्याच्या नातलगांना मारहाण करण्यात आली होती. यातील दहा जणांना अटक करण्यात आली

तीन वर्षांपासून फरार पिटेकर भावंडांना अटक
वर्धा : पिंपळगाव (माथनकर) येथील सचिन पेठेकर याच्या घरावर गावातील १२ जणांनी हल्ला केला. यात सचिन व त्याच्या नातलगांना मारहाण करण्यात आली होती. यातील दहा जणांना अटक करण्यात आली असून निलेश व नरेश ज्ञानेश्वर पिटेकर हे दोघेही घटनेच्या दिवसापासून फरार होते. दरम्यान हे दोघे बुधवारी रात्री पिंपळगाव येथे आल्याची माहिती त्यांना मिळाली. यात सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथे झालेल्या वादात सचिन पेठेकर व त्याच्या नातलगांना गावातील एकूण १२ जणांना मारहाण केली होती. यात घटनेनंतर १० जणांना अटक करण्यात आली. मात्र निलेश व नरेश पिटेकर हे दोघे फरार होते. त्यांचा सर्वत्र शोध करण्यात आला मात्र ते पोलिसांच्या हाती आले नाही. अशात हे दोघे बुधवारी गावात आल्याची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विवेक लोणकर, धर्मेंद्र तोमर, वसंत पिसे, दिलीप आंबटकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)