अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास

By Admin | Updated: March 12, 2015 01:35 IST2015-03-12T01:35:16+5:302015-03-12T01:35:16+5:30

एका चार वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश समीर अडकर यांनी आरोपी मंगेश बंडू बावणे ...

Three-year rigorous imprisonment for minor girl abuse on minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास

वर्धा : एका चार वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश समीर अडकर यांनी आरोपी मंगेश बंडू बावणे (२२) रा. गिरड, वॉर्ड नं. ४, ता. समुद्रपूर यास भादंविच्या कलम ३७६, ५११ अन्वये ३ वर्षाच्या सश्रम करावासाची शिक्षा सुनावली.
१२ जून २०१३ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान आरोपी मंगेश याने एका पीडित मुलीस चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर घटनेची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला दिली. यावरून मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गिरड येथे तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर भलावी व पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांनी केला. तपासावरून न्यायालयात आरोपी विरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिद्ध करण्यासाठी युक्तीवाद करीत एकूण सात साक्षदार तपासले. संपूर्ण साक्षिदारांच्या साक्षी-पुराव्याच्या आधारे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेत न्या. अडकर यानी पीडित मुलीस न्याय दिला. सहायक पोलीस उपनिरीक्षक इंचुरकर यांनी साक्षिदारांना न्यायालयात हजर ठेवण्याचे काम पाहिले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Three-year rigorous imprisonment for minor girl abuse on minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.