शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी तीन दुकानांवर मारला छापा; १२.२३ लाखांचा गुटखा जप्त

By चैतन्य जोशी | Updated: March 21, 2023 17:06 IST

क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई : अन्न व औषध प्रशासनाने मुद्देमाल केला जप्त

वर्धा : शहरात एकाच रात्री तीन विविध पथकाने केलेल्या कारवाईत तीन दुकानांवर छापा मारुन तब्बल १२ लाख २३ हजार २११ रुपयांचा सुगंधीत तंबाखू (गुटखा) जप्त करीत तिघांविरुद्ध शहर पोलिसात अन्न व औषध विभागाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या देखरेखीत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने २० रोजी रात्रीच्या सुमारास केली. जितेंद्र रुपचंद भाटीया, राहूल जगदीश भाटीया, धर्मदास भाटीया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

आरोपी जितेंद्र भाटीया व त्याचे नातेवाईक शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन विविध ठिकाणाहून प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची साठवणूक करुन त्याची शहरातील विविध पानटपरी व इतर ठिकाणी तसेच जिल्ह्यात विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळाली होती. दरम्यान क्राईम इंटेलिजन्स पथकाच्या चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. चारही टिमने आरोपी जितेंद्र भाटीया याच्या गोदामाची माहिती काढली. पथकांना चार पैकी तीन गोदामात सुगंधीत तंबाखू गुटखा साठवणूक केल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती देत पोलिसांसोबत छापा मारण्याबाबत आदेश दिले. अन्न व औषध प्रशासनासह पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी जितेंद्र भाटीया, राहूल भाटीया, धर्मदास भाटीया यांच्या मालकीचे बडे चौकात असलेले प्रिया ट्रेडर्स तसेच मोहता मार्केट परिसरात असलेले मनोज ट्रेडर्स आणि एम.के. गोदाम या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा मारला.

पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने मारलेल्या छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याचे दिसून आले. तसेच विविध कंपन्यांचा सुगंधीत तंबाखू साठा मिळून आला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करुन दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबोळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, मंगेश आदे, अभिषेक नाईक, हर्शल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल वानखेडे यांनी तसेच अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनात किरण गेडाम, अमित तृपकाने, संजय धकाते, रमन बावणे यांनी संयुक्तरित्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडwardha-acवर्धा