ट्रक-दुचाकी अपघातात तिघे गंभीर

By Admin | Updated: October 19, 2015 02:17 IST2015-10-19T02:17:54+5:302015-10-19T02:17:54+5:30

नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली.

Three seriously injured in a truck-bike accident | ट्रक-दुचाकी अपघातात तिघे गंभीर

ट्रक-दुचाकी अपघातात तिघे गंभीर

कारंजा (घाडगे): नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका युवकासह दोन युवती असे तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी ४.३० वाजता येथील गोळीबार चौकात घडली.
विलास नरेंद्र पाटील (२५), संगीता नागोराव इरपाते (१८) आणि संजीवनी प्रभाकर सातपुते (१८) तिघे रा. कारंजा अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना उपचारार्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
पोलीस सूत्रानुसार, व्ही. जे. १० झेड ९७५६ या ट्रकचा चालक त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन नागपूरहून अमरावतीकडे जात होता. दरम्यान कारंजा येथील गोळीबार चौकातून बसस्थानकाकडे दुचाकीने नरेंद्र पाटील, संगीती इरपाते, संजीवनी सातपुते हे तिघेही जात होते. दरम्यान ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जबर धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. भरत राणा असे ट्रकचालकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या चालकाला ताब्यात घेतले असून वृत्त लिहीस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा तपास कारंजा पोलीस करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)

भरधाव सुमो धडकली
तळेगाव (श्या.पंत.): येथील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वळणावर रविवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वाहनाला अपघात झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला. तर अन्य किरकोळ जखमी झाले. कार्तिक भास्कर तडस (२१) रा. नंदनवन नागपूर असे जखमीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपूर येथील आठ युवक अंबा देवीच्या दर्शनासाठी अमरावतीला जात होते. दरम्यान, त्यांच्या एम.एच.३६ एफ ८२०९ या वाहनाला सत्याग्रही घाटात अपघात झाला. यात वाहनाने तीन पलट्या घेतल्या. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Three seriously injured in a truck-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.