गोठ्यात दबून तीन बैलांचा मृत्यू; एक गंभीर
By Admin | Updated: September 2, 2015 03:43 IST2015-09-02T03:43:13+5:302015-09-02T03:43:13+5:30
तालुक्यातील राळेगाव येथील विनायक धापटे यांचा गावाजवळील गोठा मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास

गोठ्यात दबून तीन बैलांचा मृत्यू; एक गंभीर
समुद्रपूर : तालुक्यातील राळेगाव येथील विनायक धापटे यांचा गावाजवळील गोठा मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोसळला. यात दबून तीन बैलांचा मृत्यू झाला. तर एक बैल गंभीर जखमी झाला. ऐन हंगामात चार लाखांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
गत तीन चार दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे राळेगाव येथील विनायक धापटे यांचा गोठा जिर्ण झाला. यात मंगळवारी पहाटे तो अचानक कोसळला. यात गोठ्यात बांधून असलेले तीन बैल जागीच ठार झाले तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे. गोठ्यात असलेली दुचाकीसुद्धा क्षतीग्रस्त झाली. यात धोपटे यांचे चार लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तलाठी इंगळे व ग्रामसेवक जयंत ठाकरे यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल पाठविला. शेतकऱ्यांला शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)