शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या बहाण्याने एजन्सीत तिघे आले अन् पैसे घेऊन पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 14:19 IST

इन्डेन गॅस एजन्सीतील प्रकार : हातचलाखीने पळविले ११ हजार

वर्धा : अचानक तिघे कारमधून आले. मुख्य मार्गावर कार उभी करून ठाकरे मार्केट परिसरातील सिलिंडर मागण्याच्या बहाण्याने इंण्डेन गॅस एजन्सीमध्ये गेले तेथे इंग्रजीमध्ये संभाषण करून महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करुन ११ हजार १६० रुपये लंपास केले. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली असून सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

शहरातील ठाकरे मार्केट परिसरात इण्डेन गॅस एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमित कामकाज सुरु होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती या एजन्सीमध्ये गेल्या. त्यांनी इंग्रजीमध्ये संभाषण करत आम्ही विदेशातून आल्याने आम्हाला सिलिंडर हवे आहे. यासोबतच करन्सी बदलवून घ्यायची असल्याने ते कुठे मिळेल, अशी चौकशी केली. दरम्यान, एजन्सीत काम करणारी एक मुलगी पैशांचा हिशेब करत होती तेवढ्यात तिघांपैकी एक व्यक्ती तिच्या जवळ गेला. त्याने शंभरच्या ५ नोटा देऊन ५०० च्या नोटेची मागणी केली. याच दरम्यान तिच्या हातातील नोटांचे बंडल आपल्या हातात घेऊन हातचलाखीने पैसे घेऊन पोबारा केला. हिशेब जुळत नसल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

त्यामुळे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये सर्व काही उघडकीस आल्यावर एजन्सीचे संचालक शरद सराफ यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीने दिलेल्या शंभरच्या नोटांना उग्र वास असल्याचे दिसून आले. हे तिन्ही आरोपी ज्या कारने शहरात आले होते, त्या कारचा क्रमांकही विचित्रच लिहिला होता. त्यामुळे या आरोपींच्या तातडीने मुसक्या आवळण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीwardha-acवर्धा