लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण याच बालेकिल्ल्याचा मागील ६८ वर्षांचा इतिहास बघितल्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि पुढाऱ्यांच्या मतभेदाचा फायदा घेत तीन वेळा येथे भाजपाचे कमळ फुलले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे असले तरी सध्या २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.स्वातंत्र्य लढ्याला सेवाग्राम येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी दिशा देण्याचे काम केले. त्यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची ख्याती देशात आहेच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसने पक्षांतर्गत प्रायमरी निवडणूक घेऊन तळागाळातील पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा कौल जाणून घेतला होता. व त्यातून उमेदवार निवडला. काँग्रेसचे सागर मेघे व भाजपचे रामदास तडस यांच्यात सामना झाला. मात्र, प्रत्यक्ष एकूण मतदानापैकी ५३.०४ टक्के मत घेत भाजपचे रामदास तडस विजयी झाले. या निवडणुकीनंतर दत्ताजी मेघे पुत्रासह काँग्रेसचा हात सोडून भाजपवासी झाले. त्यामुळे त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय समिकरणेच बदलली. याचा परिणामही विधानसभेच्या निवडणुकीवर दिसून आला. सुरूवातीच्या १९५१ ते १९८९ या निवडणुका काँग्रेसने सहजपणे जिंकल्या. बाहेरचे अनेक उमेदवार वर्ध्यातून निवडून गेलेत. सुरुवातीच्या चार निवडणुकीत बजाज परिवारातील उमेदवारालाच मतदारांनी पसंती दिली.पहिली लोकसभा निवडणूक वर्धा मध्यप्रदेश (वऱ्हाड) प्रांतात असताना झाली. त्यानंतर मुंबई प्रातांत असताना १९५७ मध्ये काँग्रेसला कौल मिळाला. जमनालाल बजाज सलग तीनवेळा वर्धेचे खासदार राहिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्ली दरबारी वर्ध्याचे प्रतिनिधित्व केले.दोघांना मिळाली तीनदा संधीकमलनयन बजाज आणि वसंत साठे या दोन काँग्रेस नेत्यांना वर्धा मतदार संघाने सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून दिले. वसंत साठे अकोला मतदारसंघ सोडून वर्ध्यात लढण्यासाठी आले होते. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर साठे विजयी झाले. त्यानंतर वर्धेकरांनी कधीही सलग संधी कुणालाही दिली नाही. मात्र, दत्ताजी मेघे यांना दोनदा खासदार होण्याची संधी मिळाली. रामटेक मतदारसंघ सोडून मेघे थेट वर्ध्यात लढले व जिंकलेही.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तीनदा फुलले ‘कमळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:51 IST
वर्धा लोकसभा क्षेत्र तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; पण याच बालेकिल्ल्याचा मागील ६८ वर्षांचा इतिहास बघितल्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि पुढाऱ्यांच्या मतभेदाचा फायदा घेत तीन वेळा येथे भाजपाचे कमळ फुलले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टीचे असले तरी सध्या २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तीनदा फुलले ‘कमळ’
ठळक मुद्देबजाज, साठे, मेघेंसारख्या दिग्गजांना मिळाली संधी : राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात