सोशालिस्ट चौकात तीन लाखांची घरफोडी

By Admin | Updated: November 22, 2015 02:19 IST2015-11-22T02:19:01+5:302015-11-22T02:19:01+5:30

येथील सोशालिस्ट चौक परिसरात असलेल्या वकारे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने चोरी करीत घरातून ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

Three lakhs of burglars at the Socialist Square | सोशालिस्ट चौकात तीन लाखांची घरफोडी

सोशालिस्ट चौकात तीन लाखांची घरफोडी

पोलिसांना कुठलाही सुगावा नाही : शहर ठाण्यासह एलसीबीचे पोलीस हजर
वर्धा : येथील सोशालिस्ट चौक परिसरात असलेल्या वकारे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने चोरी करीत घरातून ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशालिस्ट चौक परिसरत असलेल्या प्रशांत प्रभाकर वकारे यांची बहिण घराला कुलूप लावून केळकरवाडी येथे भावाला भेटण्याकरिता गेल्या होत्या. दरम्यान चोरट्याने त्यांच्या घरातील मागच्या दाराची कडी काढून चोरट्याने दाराची कडी काढून घरात प्रवेश केला. यात चारेट्याने घरात असलेल्या कपाटातील सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टॅब, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
प्रशांत वकारे घरी परतले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यावरून त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून पंचनामा केला. मात्र त्यांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. या प्रकरणी शहर ठाण्यात भादंविच्या कलम ३८०, ४५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. भर वस्तीत झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Three lakhs of burglars at the Socialist Square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.