दोघा मारेकऱ्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:36 IST2019-05-05T21:36:13+5:302019-05-05T21:36:55+5:30

अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन नजीकच्या जळगाव येथील नितीन नागोसे याची तेथीलच एका अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व वडिलांनी हत्या केली. या प्रकरणातील तिनही आरोपींना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले ..........

Three killed in police custody | दोघा मारेकऱ्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी

दोघा मारेकऱ्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी

ठळक मुद्देजळगाव येथील हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन नजीकच्या जळगाव येथील नितीन नागोसे याची तेथीलच एका अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व वडिलांनी हत्या केली. या प्रकरणातील तिनही आरोपींना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात तर अल्पवयीन मुलाच्या आरोपी आई व वडिलाची दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नितीनच्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केल्यानंतर नितीनचा मृतदेह सूर्य मावळतीला जाईपर्यंत घरातच ठेवला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नितीनचा मृतदेह शेताच्या धुºयाजवळ फेकून दिला होता. सकाळी हाच मृतदेह त्याच परिसरातून जाणाºया एका महिलेला निदर्शनास आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला. विशेष म्हणजे आरोपी महिला व मृतक नितीन नागोसे यांच्यात अनैतिक संबंध होते. नितीनला समज देऊनही तो ऐकण्यास तयार नसल्याने कुºहाडीने मारहाण करून त्याचा तिनही आरोपींनी संगणमत करून काटाच काढल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
सदर घटना उघडकीस येताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपासाला गती दिली. त्यानंतर अवघ्या काही तासातच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्यात वापरेली कुºहाड पोलिसांनी जप्त केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्त मिश्रीत माती तसेच साधी मातीचे नमुने घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Three killed in police custody

टॅग्स :Murderखून