दोन अपघातात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:33 PM2018-06-23T23:33:45+5:302018-06-23T23:34:29+5:30

जाम व पवनार येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी झाले. यात जाम येथे स्पार्पिओ उलटली तर पवनार येथे शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. दोन्ही अपघात शनिवारी सकाळी घडलेत.

Three injured in two accidents | दोन अपघातात तिघे जखमी

दोन अपघातात तिघे जखमी

Next
ठळक मुद्देआजंती शिवार व पवनार येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/हिंगणघाट : जाम व पवनार येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी झाले. यात जाम येथे स्पार्पिओ उलटली तर पवनार येथे शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. दोन्ही अपघात शनिवारी सकाळी घडलेत.
जाम येथे स्कार्पिओ वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. यात युवक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर आजंती शिवारातील मोठा हनुमान मंदिराजवळ घडली. रक्षेश महेश पटेल (२०) रा. जाम, असे जखमी युवकाचे नाव आहे. तो स्कार्पिओ क्र. एमएच १५ बीडी ९८७९ ने जाम येथून हिंगणघाटच्या दिशेने एकटाच येत होता. दरम्यान, अचानक वाहनाचा समोरील टायर फुटल्याने चालक रक्षेश याचे नियंत्रण सुटून वाहन चार पलट्या घेत दुभाजक ओलांडून जामकडे जाणाऱ्या मार्गावर एका कडेला जाऊन आदळले. अपघात होताच नागरिकांनी धाव घेत रक्षेश पटेल याला गाडीतून बाहेर काढून उपचारार्थ प्रथम हिंगणघाट येथील खासगी रुग्णालयात भरती व नंतर नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. रक्षेश पटेल हा जाम येथील संतराम हॉटेलचे मालक महेश पटेल यांचा मुलगा आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.
शिवशाहीची टिप्परला धडक
पवनार - यवतमाळ आगाराच्यास एमएच ०९ इएम १४६७ क्रमांकाच्या शिवशाही बसने टिप्परला मागाहून धडक दिली. हा अपघात शनिवारी पवनार नजीक घडला. यात बसमधील वीणा पाहुणे (६५) यांच्या दाताला मार लागला तर चालक सलीम शेख (४५) हे किरकोळ जखमी झाले. बसमध्ये २३ प्रवासी होते. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. टिप्परने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बस अनियंत्रित झाली व टिप्परवर आदळली. अपघातानंतर टिप्पर पसार झाला. अपघातात शिवशाहीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Three injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.