कार-दुचाकीच्या अपघातात तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:58 IST2019-07-01T22:57:46+5:302019-07-01T22:58:10+5:30
भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात कारचालकासह दुचाकीवरील दोघे असे एकूण तीन जण जखमी झाले. हा अपघात वर्धा-वायगाव(नि.) मार्गावर इंझापूर शिवारात शिवनेरी ढाब्याजवळ सोमवारी झाला. रुपेश पाल, अंकीत साळवे आणि दिलीप साळवे अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कार-दुचाकीच्या अपघातात तिघे जखमी
वर्धा : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात कारचालकासह दुचाकीवरील दोघे असे एकूण तीन जण जखमी झाले. हा अपघात वर्धा-वायगाव(नि.) मार्गावर इंझापूर शिवारात शिवनेरी ढाब्याजवळ सोमवारी झाला. रुपेश पाल, अंकीत साळवे आणि दिलीप साळवे अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच.३१ ए.जी. ४३७९ क्रमांकाच्या कारने एम.एच.८२४० क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील अंकीत साळवे, दिलीप साळवे आणि कारचालक रुपेश पाल हे जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी अंकीत व दिलीप यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात येते. माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे प्रकाश लोंढेकर, भागीरथ बडे व जयवंत ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून अपघात ग्रस्त वाहने ताब्यात घेतली. शिवाय पंचनामा केला. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे.