कपडे धुवायला गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: July 24, 2016 15:12 IST2016-07-24T15:12:15+5:302016-07-24T15:12:15+5:30
देवळी तालुक्यातील आगरगाव येथील पारधी बेडयावरील तीन मुली गिट्टी खदानच्या खड़ड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेल्या होत्या.

कपडे धुवायला गेलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. २४ - देवळी तालुक्यातील आगरगाव येथील पारधी बेडयावरील तीन मुली गिट्टी खदानच्या खड़ड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुवायला गेल्या होत्या. यातील एकीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली.
अंजली हिरणसिंग भोसले (१८) इयत्ता दहावी, रोहिणी सुरेंद्रसिंग चव्हाण (१६) इयत्ता आठवी आणि सुवर्णा विजुरामसिंग चव्हाण (१४) इयत्ता सहावी या तिघी गिट्टी खदानमुळे पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने कपडे धुवायला गेल्या होत्या.
कपडे धुवत असताना रोहिणीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी अंजली आणि सुवर्णा या दोघी पाण्यात उतरल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तिघींचाही बुडून करुण अंत झाला. आगरगाव येथे गिट्टी खदान आहे. येथे नियमबाह्य आणि अधिक खोल खड्डे करण्यात आले आहेत. या खड्ड्यात बुडून तीन मुलींचा नाहक बळी गेला.