दोन घरफोड्यांत तिघांना अटक; साडेचार लाखांचा ऐवज जप्त
By Admin | Updated: August 29, 2014 00:00 IST2014-08-29T00:00:25+5:302014-08-29T00:00:25+5:30
स्वागत कॉलनी आणि म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगरात झालेल्या घरफोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याजवळून चार लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दोन घरफोड्यांत तिघांना अटक; साडेचार लाखांचा ऐवज जप्त
वर्धा : स्वागत कॉलनी आणि म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगरात झालेल्या घरफोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याजवळून चार लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात एकूण तिघांना जणांचा अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे रोशन उर्फ चिकन्या मोतीराम क्षिरसागर (२०) व सागर विलास राऊत (२१) दोघेही रा. बांगर नगर वाघापूर नाका, यवतमाळ तसेच सुनील आनंद कांबळे (३५) रा. जुनागडगंज नागपूर, ह.मु. नागसेन नगर वर्धा अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२१ जुलै रोजी स्वागत कॉलनी येथील रविंद्र गुलाबराव उडान (३९) हे सहपरिवार घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान त्यांच्या घराच्या मागील दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटातून सोन्याचा गोफ, मोबाईल व रोख ९१ हजार असा एकूण ६५ हजार १०० रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी तक्रारीवरून शहर ठाण्यात कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याच्या तपासारम्यान मिळालेल्या माहितीवरून यवतमाळ येथील रोशन उर्फ चिकन्या मोतीराम क्षिरसागर याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच सदर गुन्हा व्हीस्टा गाडीने साथीदार सागर विलास राऊत (२१) याच्यासह अन्य एकासह केल्याचे कबूल केले. त्यावरून गुन्ह्यातील इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून चोरीस गेलेला मोबार्ईल व गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण चार लाख १६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपीने वर्धेतील इतर तीन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
२२ आॅगस्ट २०१४ रोजी म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरातील राजकुमार प्रेमदास निताळे (२४) यांच्या बंद घराचे दार अज्ञात चोरट्यांनी उघडून एक गॅस सिलिंडर, बुद्धाची मूर्ती व मोबार्ईल, असा तीन हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून संशयित म्हणून सुनील आनंद कांबळे (३५) रा. जुनागडगंज नागपूर, ह.मु. नागसेननगर याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा त्याचा मित्र दत्तू याच्या मदतीने केल्याचे कबुल केले. यात एक सिलिंडर व गुन्ह्यातील दुचाकी असा एकूण एम.एच.३२ डब्ल्यू २१६९ असा ४२ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई एसपी अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे यांच्यासह सहायक उपनिरीक्षक उदयसिंग बारवाल, जमादार अशोक वाट, अमर लाखे, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, समीर कडवे, कुलदिप टाकसाळे, विलास लोहकरे, अजय वानखेडे यांंनी केली.(प्रतिनिधी)