शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर; तरुणाचा गळा आवळून खून, तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 18:06 IST

मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून त्याचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून केला. 

ठळक मुद्देआर्वीतील घटना

देऊरवाडा (आर्वी) : उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करीत २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना येथील विठ्ठल वार्डात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे.

अब्दुल रहीम अब्दुल मजिद (६०) अब्दुल जुनेद अब्दुल रहीम (२२)अब्दुल जमीर अब्दुल रहीम (२०) सर्व रा. विठ्ठल वॉर्ड आर्वी, अशी आरोपींची नावे आहेत. तर, गणेश तुकाराम सोनकुसरे ( ४९, रा. रविदास मंदिर जवळ बेल्पुरा अमरावती) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा रितिक हा मानसिक रुग्ण असून उपचार सुरू होता. ते आपल्या मुलाला मुलाला उपचारासाठी विठ्ठल वॉर्डातील रहिवासी असलेल्या या तिघांकडे घेऊन आले. तांत्रिक विद्येचा वापर करून आम्ही त्याला बरे करूच असे चित्र आरोपींनी निर्माण केले. त्यांनी मुलावर तांत्रिक उपचार केले व त्यानंतर संगनमत करून तरुणाचा गळा आवळून खून केला. 

म्हणे जिन सवार...झोपू द्या त्याला

आरोपींनी रितिक याची गळा आवळून हत्या केल्यावर रितिकला त्याच्या वडिलांच्या हवाली करण्यात आले. पण आपले पितळ उघडे पडू नये तसेच रितिक गतप्राण झाला याची कुठलीही शंका मृताच्या वडिलांना येऊ नये म्हणून आरोपींनी रितिकवर जीन सवार आहे. तो सध्या झोपून असून त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल असे सांगितले. मात्र, अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या रितिकच्या वडिलांना रितिकच्या गळ्यावर ओरबडल्यागत दिसल्याने त्यांनी अमरावतीत दाखल होताच त्याला थेट इरविन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रितिकला मृत घोषित करताच रितिकच्या वडिलांनाही धक्काच बसला. त्यानंतर गणेश सोनकुसरे यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूwardha-acवर्धा