फळरोपवाटिकेतील चोरी प्रकरणी तिघांना अटक

By Admin | Updated: March 6, 2016 02:23 IST2016-03-06T02:23:53+5:302016-03-06T02:23:53+5:30

येथील फळरोपवाटिकेतील चोरी प्रकरणात तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला.

Three arrested in the case of theft of fruit trees | फळरोपवाटिकेतील चोरी प्रकरणी तिघांना अटक

फळरोपवाटिकेतील चोरी प्रकरणी तिघांना अटक

१६ टीन, ग्रीन नेट बंडल व नोझल जप्त
सेलू : येथील फळरोपवाटिकेतील चोरी प्रकरणात तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी केली.
येथील फळरोपवाटिकेतून २९ फेबु्रवारी रोजी १६ टिन, ग्रीन नेट बंडल व नोझल चोरी झाले होते. याबाबत रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्याने तक्रार दिली. तक्रारीवरून सेलू पोलिसांनी भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात एएसआय राजेंद्र डाखोळे, अतुल वैद्य, राजेश पचरे, काटकर, ढोणे यांनी तपास केला. यात माहितीवरून विठ्ठल उर्फ देंड्या कवडू न्यायमूर्ती (३१), रियाज नुरनबी शेख (३०) व अजय विठ्ठल राजूरकर (२९) सर्व रा. सेलू यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घरात लपवून ठेवलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three arrested in the case of theft of fruit trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.